21 October 2020

News Flash

“गेल्या ७० वर्षात जे झालं नाही ते पुढील सहा ते सात महिन्यात होणार,” राहुल गांधींनी दिला इशारा

"त्यावेळी प्रसारमाध्यमांनी माझी खिल्ली उडवली होती," राहुल गांधींनी व्यक्त केली खंत

संग्रहित फोटो (PTI)

आगामी दिवसांमध्ये संकट अजून गहिरं होणार असून तरुणांना रोजगार मिळणं कठीण होणार आहे अशा इशारा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिला आहे. राहुल गांधी यांनी व्हर्च्यूअल पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणांवर टीका केली. पुढील सहा ते सात महिन्यात देशासमोर रोजगार संकट उभं राहणार असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. करोनासंबंधी इशारा दिल्यानंतर मीडियाने आपली खिल्ली उडवली होती अशी खंतही यावेळी त्यांनी व्यक्त केली.

“भारत तरुणांना नोकरी देण्यात असमर्थ ठरणार आहे. हे स्पष्ट आहे. देश तरुणांना रोजगार देऊ शकत नाही असं याआधी गेल्या ७० वर्षात कधीही झालेलं नाही,” अशी टीका राहुल गांधी यांनी यावेळी केली.

“करोनामुळे मोठं नुकसान होईल असं मी सांगितलं असता मीडियाने माझी खिल्ली उडवली. जर तुम्हाला विश्वास नसेल तर माझं ऐकू नका. मी आज सांगतोय की, भारत तरुणांना नोकरी देऊ शकणार नाही. जर तुम्हाला पटत नसेल तर पुढील सहा ते सात महिने वाट पाहा,” असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.

यामागील कारण सांगताना राहुल गांधींनी म्हटलं आहे की, असंघटित नोकरी देऊ शकणाऱ्यांना अर्थव्यवस्थेने संपवलं आहे. “९० टक्के रोजगार असंघटित क्षेत्रात आहे. छोट्या कंपन्या, शेतकरी…सर्व व्यवस्थाच मोदींनी संपवली आहे. एकामागोमाग एक कंपन्यात बंद होत आहेत. लघु आणि मध्यम उद्योगही कर्जाच्या हफ्ते फेडण्यात मिळालेली सूट संपल्यानंतर नष्ट होतील,” असा इशारा राहुल गांधींनी दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2020 6:24 pm

Web Title: congress rahul gandhi says india will not be able to provide employment to the youth sgy 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 चीनच्या ‘या’ सात तळांवर भारताचं अत्यंत बारीक लक्ष कारण…
2 दुर्दैव! केरळमधील दुर्घटनाग्रस्त विमानातील प्रवाशांच्या मदतीला धावलेल्या २६ जणांना करोनाची लागण
3 रशिया: पुतीन यांचे विरोधक आणि विरोधी पक्षातील नेते एलेक्सी यांच्यावर चहामधून विषप्रयोग, आयसीयूत दाखल
Just Now!
X