News Flash

अमित शाह यांना करोनाची लागण झाल्यानंतर राहुल गांधींचं ट्विट, म्हणाले…

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना करोनाची लागण

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना करोनाची लागण झाली आहे. अमित शाह एम्स रुग्णालयात दाखल झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अमित शाह यांनी स्वत: ट्विट करत आपल्याला करोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली. अमित शाह यांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळताच भाजपा तसंच विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी ट्विट करत त्यांना लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा दिल्या आहेत. यामध्ये काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचाही समावेश होता.

राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “अमित शाह यांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी मी प्रार्थना करतो”.

अमित शाह यांनी स्वत: ट्विट करत आपल्या करोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली आहे. करोनाची प्राथमिक लक्षणं दिसत असल्याने चाचणी केली असताना आपला रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं अमित शाह यांनी सांगितलं.

अमित शाह यांनी ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, “करोनाची प्राथमिक लक्षणं दिसत असल्याने आपण चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी प्रकृती ठीक आहे, पण डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आपण रुग्णालयात दाखल होत आहोत. माझी विनंती आहे की, गेल्या काही दिवसांमध्ये जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी स्वत:चं विलगीकरण करावं आणि आपली चाचणी करुन घ्यावी”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2020 8:34 pm

Web Title: congress rahul gandhi tweet after amit shah test corona positive sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 “कोणत्याही राज्यावर भाषेची जबरदस्ती नाही”, नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणावरुन केंद्र सरकारचं स्पष्टीकरण
2 मोठी बातमी! अमित शाह यांना करोनाची लागण
3 ड्रोन, शहरात प्रवेशबंदी, पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई; अयोध्येत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
Just Now!
X