25 October 2020

News Flash

काँग्रेस खासदार अहमद पटेल करोना पॉझिटिव्ह

स्वतः ट्विट करुन अहमद पटेल यांनी दिली माहिती

राज्यसभा खासदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांना करोनाची बाधा झाली आहे. त्यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनी याबाबत स्वतः ट्विट करुन माहिती दिली आहे. “माझा करोना चाचणी अहवाल हा पॉझिटिव्ह आला असून गेल्या काही दिवसांमध्ये जे लोक माझ्या संपर्कात आले त्यांनी त्यांची करोना चाचणी करुन घ्यावी” अशी विनंती करणारं ट्विट अहमद पटेल यांनी केलं आहे.

मंगळवारी रात्री भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना करोनाची बाधा झाल्याची बातमी समोर आली होती व्यंकय्या नायडू हे परवापासून होम क्वारंटाइन आहेत. भारतात आत्तापर्यंत ६३ लाखांपेक्षा जास्त लोकांना करोनाची बाधा झाली आहे. ही आत्तापर्यंतची एकूण संख्या आहे. तर उपचार घेत असताना ९८ हजारांपेक्षा जास्त रुग्णां करोनाची बाधा झाल्याने मृत्यू झाल आहे. संपूर्ण देशात ५२ लाखांपेक्षा जास्त रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2020 6:26 pm

Web Title: congress rajya sabha mp ahmed patel tests positive for coronavirus scj 81
टॅग Coronavirus
Next Stories
1 आर्मेनिया-आझरबैजानमध्ये सुरु असलेल्या युद्धात पाकिस्तानची उडी का?
2 #डरपोक_योगी टॉप ट्रेण्डमध्ये; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर तासाभरात २२ हजार Tweets
3 भाजपा सरकारच्या उद्धटपणाला मर्यादा नाही – काँग्रेस
Just Now!
X