08 March 2021

News Flash

सचिन पायलट यांच्यासाठी सर्व दरवाजे खुले – काँग्रेस

भाजपाने कितीही षडयंत्र रचलं तरी राजस्थानमधील सरकार मजबूत – काँग्रेस

संग्रहित

बंडाचा झेंडा हाती घेतलेले राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांची मनधरणी करण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरु आहेत. सचिन पायलट यांच्यासाठी सर्व दरवाजे खुले असल्याचं काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं आहे. सोबतच भाजपाने कितीही षडयंत्र रचलं तरी राजस्थानमधील सरकार मजबूत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

“कुटुंबात जर कोणी नाराज असेल तर कुटुंबातील इतर सदस्यांसोबत चर्चा करुन त्यावर  उपाय शोधला पाहिजे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यातर्फे मी सांगू इच्छितो की, सचिन पायलट आणि इतर कोणत्याही सदस्यांसाठी काँग्रेस पक्षाचे दरवाजे नेहमी खुले आहेत,” अस रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- राजस्थानात कमळ फुलणं इतकं सोपं नाही कारण…

“राजस्थानमधील सरकार स्थिर असून आम्ही पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करु असा विश्वास आहे. भाजपाकडून सरकार पाडण्यासाठी कोणतंही षडयंत्र रचलं तरी यश मिळणार नाही,” असं रणदीप सुरजेवाला यांनी यावेळी सांगितलं. रणदीप सुरजेवाला यांनी यावेळी काँग्रेस नेत्यांच्या घरावर छापे टाकण्यावरुनही भाजपावर टीका केली. आयटी, ईडी, सीबीआय भाजपाचे वकील असून असे छापे टाकून सरकार कोसळणार नाही असं रणदीप सुरजेवाला यांनी सांगितलं आहे.

आणखी वाचा- भाजपात प्रवेश करणार नाही, सचिन पायलट यांनी केलं स्पष्ट

“राजस्थानमधील सरकार स्थिर असून आम्ही पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करु असा विश्वास आहे. भाजपाकडून सरकार पाडण्यासाठी कोणतंही षडयंत्र रचलं तरी यश मिळणार नाही,” असं रणदीप सुरजेवाला यांनी यावेळी सांगितलं.

आणखी वाचा- पंतप्रधान नरेंद्र मोदी सूडाचं राजकारण करतात, शरद पवारांचा आरोप

आणखी वाचा- सचिन पायलट यांची बेशिस्त खपवून घेणार नाही – काँग्रेस

“पक्षातील कोणत्याही पदावरील व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा त्रास असेल तर त्यांनी पुढे येऊन पक्षासमोर मांडावं. आम्ही ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न करु आणि सरकारही मजबूत ठेऊ,” असं आवाहन यावेळी रणदीप सुरजेवाला यांनी केलं. सोबतच राज्यातील सरकार स्थिर राहण्यासाठी सर्व आमदारांनी बैठकीत सहभागी व्हावं असं आवाहन केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2020 12:22 pm

Web Title: congress randeep surjewala on rajasthan sachin pilot sgy 87
Next Stories
1 “अमेरिकेपेक्षा भारतात करोनाची परिस्थिती बरी; मला आयुष्यभर इथेच राहू द्या”
2 भर बाजारात लटकलेल्या अवस्थेत आढळला भाजपा आमदाराचा मृतदेह, हत्येचा संशय
3 पद्मनाभ स्वामी मंदिराबद्दल सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Just Now!
X