डॉलरच्या तुलनेत रूपयाने सार्वकालिक नीचांक गाठल्यानंतर आज काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. २०१४ पूर्वी रूपया घसरल्यानंतर भाषण देणाऱ्यांनी आता मौनव्रत पत्कारले आहे, असा टोला काँग्रेसने लगावला आहे. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदिप सुरजेवाला यांनी ट्विट करून भाजपावर हल्लाबोल केला आहे. लुढ़कता रुपया, पहुँचा रूपया ७२ पार, वित्तीय धाटा बढ़ेगा, महँगाई ने मचाया हाहाकार। जो 2014 में गला फाड़ कर रूपये पर भाषण देते थे, वो मौन होकर बैठे हैं, अशा शब्दांत पंतप्रधान मोदीं टीका केली आहे. अर्थमंत्र्यांना विचारले तर ते आंतरराष्ट्रीय कारणांचा हवाला देतात. पण सत्य हे आहे की, भाजपाच्या धोरणांमुळे अर्थव्यवस्थेची दुरवस्था झाली आहे, असे सुरजेवाला यांनी म्हटले आहे.

अपयशी ‘मोदीनॉमिक्स’मुळे देशावर गंभीर आर्थिक संकट: काँग्रेस

दरम्यान, गुरूवारी रूपयामध्ये ३७ पैशांची घसरण दिसून आली. रूपया पहिल्यांदाच ७२ रूपये प्रति डॉलरवर पोहोचला. दुपारनंतर रूपया प्रति डॉलर ७२.१२ रूपयांपर्यंत गेला होता. बुधवारी बाजार बंद होताना ३७ पैशांनी रूपया घसरला होता. दरम्यान परिस्थिती हाताबाहेर जात असतानाही सरकार अजूनही ‘गंभीर आर्थिक’ संकट मान्य करण्यास नकार देत असल्याचा आरोप त्यांनी दोन दिवसांपूर्वी केला होता.