अरुणाचल प्रदेशमधील काँग्रेसचे बंडखोर नेते कालिको पल यांनी पक्षाचे आणखी आमदार संपर्कात असल्याचा दावा केला असून, त्यांची संख्या वाढतच जाईल, असे म्हटले आहे.
काँग्रेसच्या आमदारांनी बंडखोरी केल्याने राज्यात राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला आहे. त्यांची अभिरुप विधानसभा घेऊन मुख्यमंत्रिपदी निवड करण्यात आली होती.
अरुणाचल प्रदेश विधानसभेत एकूण ६० आमदार असून त्यापैकी काँग्रेसचे ४७ आमदार आहेत. त्यापैकी काँग्रेसचे २१ जण भाजपचे ११ जण आणि दोघा अपक्ष आमदारांनी पल यांना पाठिंबा दिल्याचा दावा आहे. राज्य विधानसभेचे अधिवेशन बोलाविण्याची राज्यपाल ज्योतिप्रसाद राजखोवा यांची कृती घटनेने त्यांना दिलेल्या अधिकारांतच असल्याचे मत काँग्रेसच्या बंडखोर आमदारांनी व्यक्त केले आहे.