21 January 2021

News Flash

सोनिया, राहुल आणि प्रियंका असणार बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसचे स्टार प्रचारक

बिहार निवडणुकीसाठी करण्यात आली यादी जाहीर

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे स्टार प्रचारक कोण असणार ही यादी आता समोर आली आहे. यामध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आणि खासदार राहुल गांधी असणार आहेतच. शिवाय गुलाम नबी आझाद, सचिन पायलट आणि शत्रुघ्न सिन्हा यांचाही या यादीत समावेश आहे. याशिवाय माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, अशोक गेहलोत, तारिक अन्वर, रणदीप सुरजेवाला हे सगळेही स्टार प्रचारक असणार आहेत.

बिहार विधानसभा निवडणूक तीन टप्प्यात पार पडणार आहे. २८ ऑक्टोबर पहिल्या टप्प्यातील, ३ नोव्हेंबरला दुसऱ्या टप्प्यात व ७ नोव्हेंबरला तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. करोना पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणूक होत असून, केंद्रीय निवडणूक आयोगानं करोना रुग्णांना मतदानापासून राहावं लागू नये म्हणून विशेष व्यवस्था केली आहे. दरम्यान भाजपा आणि जदयू यांनी सोबत लढण्याचा निर्णय घेतला आहे. तर लोजपा या दोन पक्षांसोबत काडीमोड घेतला आहे.

भाजपा आणि जदयू यांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. पुन्हा एकदा आमचीच सत्ता येणार असाही दावा करण्यात आला आहे. आता काँग्रेसचे स्टार प्रचारक विरुद्ध भाजपाचे दिग्गज असा सामना निवडणूक प्रचारात पाहण्यास मिळणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2020 6:33 pm

Web Title: congress releases list of star campaigners for upcoming bihar elections 2020 the list includes sonia rahul and priyanka gandhi scj 81
Next Stories
1 तुम्हाला मुस्लिमांना दुय्यम दर्जाचे नागरिक बनवायचं आहे; ओवेसींचं भागवतांवर टीकास्त्र
2 जम्मूतल्या दादूरा भागात दोन दहशतवाद्यांचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरु
3 भारतात केवळ हिंदूंनाच राहण्याचा अधिकार असल्याचं राज्यघटनेत म्हटलेलं नाही- सरसंघचालक
Just Now!
X