News Flash

…तसंच केरळमधील घटनेसाठी राहुल गांधींना जबाबदार ठरवता येणार नाही; मनेका गांधींना काँग्रसेचं उत्तर

तुमच्याप्रमाणेच राहुल गांधीही केंद्रीय मंत्रिमंडळात नाहीत

माजी केंद्रीय मंत्री व भाजपाच्या खासदार मनेका गांधी. (संग्रहित छायाचित्र)

केरळमध्ये गर्भवती हत्तीणीचा फटाक्यानं भरलेलं अननस खाल्ल्यानं मृत्यू झाला. काही लोकांनी हे कृत्य केलं. यानंतर देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. या घटनेवरून भाजपाच्या नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती. मनेका गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेत काँग्रेसनं उत्तर दिलं आहे.

गर्भवती हत्तीणीचा काही निर्दयी लोकांनी फटाक्यांनी भरलेलं अननस खायला दिल्याने मृत्यू झाल्याची अमानुष घटना बुधवारी समोर आली. हत्तीणीच्या तोंडात फटाके फुटले आणि हत्तीणीच्या गर्भाशयात वाढणार्‍या पिलासह तिचा मृत्यू झाला. मन्न सुन्न करणाऱ्या घटनेचे देशभरात पडसाद उमटले. सोशल माध्यमातून लोकांनी या घटनेचा निषेध करत आरोपींविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. या घटनेवरून भाजपाच्या खासदार मनेका गांधी यांनी राहुल गांधींवर टीका केली होती. त्या टीकेला काँग्रेसनं उत्तर दिलं.

काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा यांनी ट्विट केलं आहे. “मॅडम, तुमच्या प्रमाणेच राहुल गांधीही केंद्रीय मंत्री नाहीत. जसं उत्तर प्रदेशात जे काही घडत आहे, त्यासाठी तुम्हाला सत्ताधारी पक्षाच्या खासदार म्हणून दोष देता येणार नाही, तसंच केरळमध्ये जे काही घडलं, त्यासाठी राहुल गांधी यांना दोष देता येणार नाही. समजलं? धन्यवाद,” असं म्हणत खेरा यांनी मनेका गांधी यांना टोला लगावला आहे.

आणखी वाचा- केरळमध्ये गर्भवती हत्तीणीचा मृत्यू, मनेका गांधी संतापल्या; राहुल गांधींवर साधला निशाणा

काय म्हणाल्या होत्या मनेका गांधी ?

केरळमधील मल्लपुरम जिल्ह्यात हत्तीणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी मेनका गांधींनी केरळमधील वायनाडमधून कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती. “वन विभागाच्या सचिवांची पदावरून हकालपट्टी करण्यात यावी. त्याचबरोबर वन्यजीव संरक्षण खात्याच्या मंत्र्यांना थोडीजरी समज असेल तर त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा”, असे मेनका गांधी म्हणाल्या होत्या. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना त्या म्हणाल्या, ‘कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी त्याच भागातील आहेत. त्यांनी अद्याप कारवाई का केली नाही?’ असा प्रश्नही मनेका गांधी यांनी विचारला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2020 6:07 pm

Web Title: congress reply to maneka gandhi on elephant death statment bmh 90
Next Stories
1 तबलिगी जमातच्या २५५० परदेशी सदस्यांना १० वर्षांसाठी भारत प्रवेशास बंदी, गृहमंत्रालयाची मोठी कारवाई
2 मोदीजी, हे सगळे देशासमोर आणा; काँग्रेस नेते राजीव सातव यांची मागणी
3 हत्तीणीला ठार करणाऱ्यांची संस्कृती कोणती? कुमार विश्वास यांचा संतापजनक प्रश्न
Just Now!
X