23 October 2018

News Flash

सरन्यायाधीशांच्या निवासस्थानी विशेष दूत का पाठविला?

नृपेंद्र मिश्रा हे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या ५, कृष्ण मेनन मार्गावरील निवासस्थानी गेले,

सरन्यायाधीश दीपक मिश्रा

मोदींनी स्पष्टीकरण देण्याची काँग्रेसची मागणी

पंतप्रधानांचे प्रधान सचिव सरन्यायाधीशांच्या निवासस्थानी गेल्याबाबत माध्यमांनी दिलेल्या वृत्ताचा धागा पकडून काँग्रेसने शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. सरन्यायाधीशांकडे विशेष दूत का पाठविण्यात आला होता, ते मोदी यांनी स्पष्ट करावे, असे काँग्रेसने म्हटले आहे. नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा हे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या निवासस्थानी जात असल्याचे दूरदर्शनवरील फितीतून स्पष्ट झाले. तथापि, दीपक मिश्रा यांच्या निवासस्थानाचे फाटक खुले नसल्याने नृपेंद्र मिश्रा काही वेळ तेथे थांबून माघारी फिरल्याचे फितीतून स्पष्ट झाले. सर्वोच्च न्यायालयातील चार ज्येष्ठ न्यायाधीशांनी सरन्यायाधीशांविरुद्ध बंडाचा झेंडा फडकावला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी वरील घडामोडी घडल्या. दूरदर्शनवरून नृपेंद्र मिश्रा यांची फीत प्रसारित होताच काँग्रेसने सरकारवर जोरदार टीका केली. नृपेंद्र मिश्रा हे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या ५, कृष्ण मेनन मार्गावरील निवासस्थानी गेले, त्यामुळे विशेष दूत पाठविण्याचे कारण मोदी यांनी सांगावे, असे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्वीट केले.

First Published on January 14, 2018 2:51 am

Web Title: congress seek explanation on principal secretary visit cji house