७१ व्या प्रजास्ताक दिनाचे औचित्य आणि नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून देशभरात सुरु असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सविंधानाची प्रत भेट म्हणून पाठवली आहे. नवी दिल्लीतील केंद्रीय सचिवालयाच्या पत्त्यावर अ‍ॅमेझॉनवरून संविधानाची प्रत काँग्रेसने भेट म्हणून पाठवली आहे. या प्रतची किंमत १७० रूपये असून पे ऑन डिलिव्हरीच्या माध्यमातून पाठवल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना ही रक्कम भरावी लागणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटरवर याबाबत ट्विट करत माहिती देण्यात आली आहे. संविधानाची प्रत पाठवत काँग्रेसने मोदींवर टीका केली आहे. ट्विटमध्ये काँग्रेसनं म्हटलेय की, ‘प्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, तुम्हाला भारतीय संविधानाची एक प्रत पाठवली असून लवकरच तुम्हाला मिळेल. देशात फूट पाडण्याच्या कामातून तुम्हाला वेळ मिळाला तर नक्की वाचा.’ काँग्रेसनं आपल्या ट्विटरवर मोदींना संविधानाची प्रत पाठवल्याचा अॅमेझॉनवरील स्नॅपशॉट पोस्ट केला आहे.

काँग्रेसने आणखी एका ट्विटमध्ये भाजपावर टीका केली आहे. यामध्ये म्हटलेय की, संविधानाच्या अनुच्छेद १४ नुसार देशातील नागरिकांना समानतेचा अधिकार आहे. हे भाजपाला अद्याप समजेलं नाही.

काँग्रेसने एकापाठोपाठ चार ट्विट केले आहे. याट्विटमध्ये संविधानाच्या अनुच्छेद १५, १९नुसार भाजपावर हल्लाबोल केला आहे.

काँग्रेसच्या या टीकेला भाजपा आता काय प्रत्युत्तर देणार याकडे नेटकऱ्यांचं लक्ष लागले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress sends pm copy of constitution tweets amazon receipt nck
First published on: 27-01-2020 at 08:30 IST