काँग्रेसचा प्रतिहल्ला

संसदेत नाटकीपणा करणे सहकाऱ्यांच्या मनोरंजनासाठी कदाचित चांगली बाब असेल, मात्र कारभार आपल्यालाच करावयाचा आहे याचे स्मरण ठेवावे, असा हल्ला काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चढविला आहे. मोदींनी संसदेत काँग्रेसवर चढविलेल्या हल्ल्यास काँग्रेसने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला.

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राहुल गांधी यांच्यावर फेसबुकवरून टीका करताना, राहुल यांना कितपत माहिती आहे, त्यांना कधी माहिती होणार, असा हल्ला चढविला होता. त्याच धर्तीवर काँग्रेसने मोदींवर, ते किती ऐकून घेणार, ते कधी ऐकणार, असा हल्ला चढविला. शेतकरी, दलित, विद्यार्थी आणि मंत्रिमंडळातील सहकारी यांच्याकडे ते दुर्लक्ष करतात, असा आरोप काँग्रेसने केला.शेतकरी, दलित, विद्यार्थी आणि मंत्रिमंडळातील सहकारी यांच्याकडे ते दुर्लक्ष करतात, असा आरोप काँग्रेसने केला.

मात्र आता वास्तवाचे भान ठेवा. संसदेत नाटकबाजी समर्थकांसाठी करमणुकीची ठरेलही, परंतु कारभाराची सूत्रे स्वीकारल्यापासून डाळींची अद्याप दुप्पट भावाने विक्री होत आहे, त्यावर मार्ग काढणे ही मोदी यांची जबाबदारी आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.