News Flash

“भारतीयांना दिलेल्या लसींपेक्षा अधिक लसी परदेशात पाठवल्याचा खुलासा BJP सरकारने UN समोर केलाय, जर…”

करोना नियंत्रणाच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारवर साधला निशाणा

प्रातिनिधिक फोटो (फोटो सौजन्य रॉयटर्स आणि ट्विटरवरुन साभार)

शुक्रवारी देशामध्ये करोनाबाधितांची संख्या तब्बल ६२ हजारांनी वाढली. २४ तासांमधील ही २०२१ मधील सर्वात मोठी वाढ छरली आहे. १६ ऑक्टोबरनंतर म्हणजेच पाच महिन्यानंतर पहिल्यांदाच एका दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात करोना रुग्ण आढळून आले आहेत. देशातील एकूण करोना रुग्णांची संख्या १ कोटी १९ लाखांहून अधिक झाल्याची माहिती आरोग्यमंत्रालयाने दिली आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यांमध्ये दुसरी लाट आल्याची घोषणा काही आठवड्यांपूर्वीच केंद्राकडून करण्यात आली. मात्र आता देशातील इतर राज्यांमध्येही करोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. याचवर आता काँग्रेसने केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्र सरकारने संयुक्त राष्ट्रांमध्ये केलेल्या दाव्याच्या आधारे काँग्रेसने भाजपाच्या करोना नियंत्रणासंदर्भातील धोरणांवर टीका केलीय.

काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ. शामा मोहम्मद यांनी ट्विटरवरुन यासंदर्भातील टीका केली आहे. “भारताने आपल्या देशातील नागरिकांना जेवढ्या करोनाच्या लसींची डोस दिले नाहीत त्याहून अधिक डोस परदेशामध्ये निर्यात केलेत, असं भाजपा सरकारने संयुक्त राष्ट्रांसमोर सांगितलं आहे. लसींचे डोस निर्यात करण्याआधी भारतीयांना प्राधान्य देत त्यांचं लसीकरण सरकारने केलं अशतं तर सध्या देशात दिसणारी करोनाची दुसरी लाट थांबवता आली असती,” अशी टीका शामा यांनी केली आहे.

गुरुवारी देशात ५९ हजार ११८ रुग्ण आढळले होते तर शुक्रवारी हा आकडा ६२ हजार २५८ वर पोहचला. गुरुवारच्या तुलनेत देशात शुक्रवारी रुग्णसंख्या ५.३ टक्क्यांनी वाढली आहे. यासोबत देशात गेल्या २४ तासात २९१ रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण रुग्णसंख्या १ लाख ६१ हजार २४० इतकी झाली आहे. याशिवाय ३० हजार ३८६ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत १ कोटी १२ लाख ९५ हजार २३ जण करोनामुक्त झाले आहेत. देशात सध्याच्या घडीला ४ लाख ५२ हजार ६४७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर ५ कोटी ८१ लाख ९ हजार ७७३ जणांचं लसीकरण झालं आहे.

३० जानेवारी २०२० रोजी भारतात सर्वात पहिला करोना रुग्ण सापडला होता. करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर अमेरिका आणि त्यानंतर ब्राझीलचा क्रमांक आहे. याशिवाय देशात सर्वाधिक करोना फटका बसलेल्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. मागील दीड महिन्यांपासून भारताने ७० हून अधिक देशांना करोना लसींचे डोस पुरवले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2021 4:42 pm

Web Title: congress slams modi government approach to suppress corona cases with help of vaccination scsg 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 “मी आज माँ कालीकडे प्रार्थना केली की…”; बांगलादेशमधील जशोरेश्वरी मंदिराला भेट दिल्यानंतर मोदींची प्रतिक्रिया
2 सप्टेंबरपर्यंत दुसरी कोविड लस सुरू करण्याची आशा अदर पूनावाला यांनी केली व्यक्त
3 मानवी लिंगाचा आकार प्रदुषणामुळे होतोय लहान; संशोधकांचा दावा
Just Now!
X