आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप -२०१९ मध्ये इंग्लंडविरोधात खेळल्या जाणाऱ्या सामन्या दरम्यान भारतीय संघाच्या भगव्या रंगाच्या जर्सीवरून वाद निर्माण झाला आहे. देशातील प्रमुख राजकीय व भाजपच्या विरोधी पक्षांनी यावर आक्षेप नोंदवत पंतप्रधान मोदींवर टीका करणे सुरू केले आहे. काँग्रेस व समाजवादी पार्टीने जर्सीचा रंग भगवा केल्याबद्दल आक्षेप नोंदवला आहे.
या दोन्ही पक्षांचे म्हणने आहे की, बीसीसीआयने केवळ केंद्र सरकारला खुश करण्यासाठी हा रंग निवडला आहे. तर भाजपाकडू हा आरोप फेटाळण्यात आला आहे. याशिवाय आयसीसीने म्हटले आहे की, ही रंगसंगती त्यांच्याकडून बीसीसीआयला पाठवण्यात आली होती. भारत व इंग्लड दरम्यान ३० जून रोजी बर्मिंघम येथे सामना होणार आहे.
सध्यातरी अधिकृतरित्या भारतीय संघाची ही नवी जर्सी समोर आलेली नाही. मात्र सोशल मिडियावर या नव्या जर्सीचे वेगेवगळे फोटो फिरत आहेत. मात्र हे निश्चित झाले आहे की इंग्लड विरूद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यात भारतीय संघाच्या जर्सीवर भगवा रंगही असणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 26, 2019 9:20 pm