21 January 2021

News Flash

अमूल डेअरी निवडणूक : ११ पैकी ८ जागांवर काँग्रेसचा विजय

निकाल सोमावारी जाहीर करण्यात आले

प्रातिनिधिक फोटो

काँग्रेसला गुजरातमध्ये स्थानिक पातळीवर महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या निवडणुकीत मोठं यश मिळालं आहे. राज्यामधील प्रसिद्ध कायरा डिस्ट्रिक्ट कोआपरेटिव मिल्क प्रोडक्शन यूनियन लिमिटेडचे (अमूल डेअरी नावने लोकप्रिय) प्रतिनिधित्व करणाऱ्या बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने ११ पैकी ८ जागांवर विजय मिळवला आहे. निर्देशक गटाची निवड करण्यासाठी मागील शनिवारी निवडणूक झाली. या निवडणुकीचे निकाल सोमावारी संध्याकाळी जाहीर करण्यात आले. ही निवड पाच वर्षांसाठी करण्यात येते. या निवडणुकीमध्ये काँग्रेसने चांगली कामगिरी केली असून ११ पैकी ८ जागांवर विजय मिळवला आहे. भाजपाचे वर्चस्व असणाऱ्या गुजरातमध्ये काँग्रेसची ही कामगिरी विशेष मानली जात आहे.

अमूल डेअरी सोसायटी विभाग परिसरामध्ये सोमवारी करण्यात आलेल्या मतमोजणीमध्ये भाजपाचे आमदार केसरसिंह सोलंकी यांचा संजय पटेल यांनी पराभव केला. पटेल यांनी २०१७ साली सोलंकींविरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती. त्याचबरोबरच आनंदमधून काँग्रेसचे आमदार कांती सोढा परमार यांनी ४१ मते मिळवत विजयावर शिक्कामोर्तब केलं. तर बोरसदमधून काँग्रेसचे आमदार राजेंद्रसिन्हा परमार हे बोरसद-अंचल या जागेवरुन निवडून आले आहेत. राजेंद्रसिन्हा परमार हे अमूलचे उपाध्यक्षही आहेत.

काँग्रेसकडून निवडणूक लढवून विजय मिळवलेल्यांमध्ये खम्भातमधून सीता परमार, पेटलादमधून विपूल पटेल, कथललमधून घीला जला, बालासिनोरमधून राजेश पाठक आणि महमदवदमधून गौतम चौहान यांचा समावेश आहे. स्थानिक पातळीवर या निवडणुकांना अधिक महत्व आहे. या निवडणुकांमध्ये विजय ठरलेल्या पक्षाला थेट ग्रामीण भागातील नागरिकांशी आणि खास करुन दुध उत्पादकांशी संबंधित प्रश्नांसंदर्भात काम करता येते. त्यामुळेच गुजरामध्ये अमुलच्या निवडणुकीला विशेष महत्व आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2020 9:11 am

Web Title: congress sweeps amul dairy polls scsg 91
Next Stories
1 दिल्लीला मागे टाकत पुणे बनलं करोनाबाधितांची राजधानी; देशातील रुग्णसंख्या ३६ लाखांच्या पार
2 …तर भारताची १९६२ पेक्षा जास्त मोठी हानी करू, चीनची धमकी
3 अभिनेता गौरव चोप्राच्या वडिलांचं निधन
Just Now!
X