01 March 2021

News Flash

मुखी महात्मा गांधींचे नाव आणि मनात मात्र नथुराम; काँग्रेसचा मोदींवर नेम

स्वच्छ भारत योजना कशी फोल ठरली हे दाखवणारे ट्विट काँग्रेसने पोस्ट केले आहे, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी याला कसे उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाचा बोजवरा उडाला आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे दावे केले आहेत ते फोल ठरले आहेत अशी टीका करत काँग्रेसने एक व्यंगचित्र ट्विट केले आहे. ज्यामध्ये स्वच्छ भारत अभियानासाठी चित्र म्हणून दाखवला गेलेला महात्मा गांधींचा चष्मा वापरण्यात आला आहे. या चष्म्यातील काचांना तडे गेल्याचे दाखवण्यात आले आहे. महात्मा गांधींचा चष्मा नजर स्वच्छ करतो आणि चुकीचे विचार हटवतो. मात्र त्यासाठी तुमच्या मनात गांधी असणे गरजेचे आहे. ज्यांचा मनात नथुराम गोडसे आहे त्यांनी मुखी गांधींचे नाव कितीही वेळा घेतले तरीही त्यांची इच्छा पूर्ण होणारच नाही असे म्हणत काँग्रेसने भाजपावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छ भारत योजनेचा नारा दिला मात्र यामध्येही भ्रष्टाचार झाला आहे. स्वच्छता अभियान हे अस्वच्छता अभियान ठरू लागले आहे. कारण अनेक भागांमध्ये दावे करण्यात आल्याप्रमाणे स्वच्छतागृहे उभारण्यात आलेलीच नाहीत. तर ज्या ठिकाणी उभारण्यात आली आहेत तिथे ती वापरली जात नाहीत असा आरोप काँग्रेसने केला आहे. काही ठिकाणी तर स्वच्छतागृहे फक्त कागदपत्रांवरच उभारली गेली आहेत त्यामध्येही भ्रष्टाचार झाला आहे असेही काँग्रेसने म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्वच्छ भारत योजना कशी अपयशी ठरली हे दाखवणारे अनेक ट्विट्स काँग्रेसने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट केले आहेत. स्वच्छ भारत योजनेत कसा भ्रष्टाचार झाला आहे त्याचीही काही उदाहरणे दाखवण्यात आली आहेत. आता यावर भाजपा काय उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 6, 2018 12:05 pm

Web Title: congress tweets against narendra modi says swachbharat is also fraud
Next Stories
1 मोदींच्या सभेसाठी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेची वेळ बदलली – काँग्रेस
2 आज दुपारी पाच राज्यातील निवडणूकांचे बिगुल वाजणार
3 बलात्काराच्या घटनेनंतर गुजरातमध्ये उत्तर प्रदेश, बिहारच्या नागरिकांवर हल्ले
Just Now!
X