06 March 2021

News Flash

आसाममधील घुसखोरी थांबविण्यात काँग्रेस असमर्थ -अमित शहा

बांगलादेशातील घुसखोरांचा काँग्रेस व्होट बँक म्हणून वापर करीत आहे, असे शहा म्हणाले.

| March 29, 2016 02:07 am

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा

आसाममध्ये बांगलादेशातून होणारी घुसखोरी थांबविण्यात काँग्रेसला यश आलेले नाही आणि बेकायदेशीरपण स्थलांतर केलेल्यांचा काँग्रेस पक्ष व्होट बँक म्हणून वापर करीत असल्याचा आरोप भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सोमवारी येथे केला.
काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी हे आसाममध्ये प्रचाराला येणार आहेत, बांगलादेशमधून येणाऱ्या घुसखोरांना आम्ही थांबवू असे सोनिया गांधी यांनी जाहीर करावे, मात्र त्या असे जाहीर करणार नाहीत कारण बांगलादेशातील घुसखोरांचा काँग्रेस व्होट बँक म्हणून वापर करीत आहे, असे शहा म्हणाले.
आसाममध्ये भाजपचे सरकार स्थापन झाले की घुसखोरीचा प्रश्न संपुष्टात येईल, आम्ही बांगलादेशची सीमा बंद करू, त्यामुळे कोणत्याही घुसखोराला येथे पाऊल ठेवणे शक्य होणार नाही, असे शहा म्हणाले. बांगलादेशातून होणारी घुसखोरी हा केवळ आसामचा प्रश्न नाही तर संपूर्ण देशाचा प्रश्न आहे, असेही त्यांनी नमूद केले. स्वातंत्र्य आणि फाळणीच्या वेळी काँग्रेसने आसामला कोठे नेऊन ठेवले होते, पं. जवाहरलाल नेहरू यांनी आसामला ‘ड’ वर्गवारीच्या राज्याचा दर्जा दिला असे शहा म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2016 2:07 am

Web Title: congress unable to stop bangladesh infiltration in assam says amit shah
Next Stories
1 उत्तराखंडमधील अन्यायाविरोधात काँग्रेस न्यायालयात
2 पाकिस्तानातील हल्ल्याचा तपास सुरू
3 पाकने पकडलेले कथित गुप्तहेर जाधव यांना सर्वतोपरी मदत
Just Now!
X