News Flash

आजीची भेट घेण्यासाठी राहुल गांधी इटलीला जाणार

वाढदिवस परदेशात साजरा करण्याची शक्यता

PM Narendra Modi, Rahul Gandhi , parliament , Modi government, Loksatta, loksatta news, marathi, Marathi news
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी पुन्हा एकदा परदेश दौऱ्यावर जाणार आहेत. मी माझ्या आजीची भेट घेण्यासाठी परदेशात जात असल्याचे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. देशात शेतकरी आंदोलन सुरु असताना राहुल गांधी परदेशात जाणार असल्याने त्यांच्यावर टीका होण्याची चिन्हे आहेत.

राहुल गांधी यांनी मंगळवारी ट्विटरवर त्यांच्या परदेश दौऱ्याविषयी माहिती दिली आहे. ‘आजी आणि नातेवाईकांची भेट घेण्यासाठी मी काही दिवसांसाठी परदेशात जात आहे. त्यांच्यासोबत काही काळ राहून पुन्हा भारतात परतेन’ असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

मध्य प्रदेश, महाराष्ट्र अशा विविध राज्यांमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. गेल्या आठवड्यात राहुल गांधी मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गेले होते. मात्र पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्यांना गावात जाऊ दिले नव्हते. शेतकरी आंदोलन चिघळत असताना राहुल गांधीही या आंदोलनात सक्रीय होऊन केंद्र सरकार आणि भाजपची कोंडी करतील अशी आशा होती. राहुल गांधी मैदानात उतरल्याने कार्यकर्त्यांमध्येही उत्साह संचारला होता. मात्र हे आंदोलन सुरु असतानाच राहुल गांधी इटलीत आजीला भेटण्यासाठी जाणार असल्याने काँग्रेसची कोंडी झाली आहे. राहुल गांधी त्यांचा वाढदिवस झाल्यानंतरच भारतात येतील अशी शक्यता आहे. १९ जून रोजी राहुल गांधी यांचा वाढदिवस असतो.

राहुल गांधी यांचे परदेश दौरे हे नेहमीच वादग्रस्त ठरले होते. केंद्रात भाजपचे सरकार सत्तेत आल्यावर राहुल गांधी सुमारे दोन महिने परदेशात होते. संसदेतील अर्थसंकल्पीय अधिवेशनातही ते गैरहजर होते. भाजपने यावरुनही काँग्रेसवर टीकास्त्र सोडले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2017 4:44 pm

Web Title: congress vice president rahul gandhi travelling abroad to meet his maternal grandmother
Next Stories
1 इस्रोचे ‘टायमिंग’ चुकले!; INRSS-1 जी उपग्रहातील ३ घड्याळे बंद
2 मांस खाऊ नका, गर्भधारणेनंतर सेक्स करू नका, गरदोर स्त्रियांना केंद्र सरकारच्या अजब सूचना
3 जर्मनीतल्या म्युनिक स्टेशनवर अज्ञात हल्लेखोराचा गोळीबार, हल्लेखोर ताब्यात
Just Now!
X