News Flash

आर्थिक मंदीवरुन काँग्रेस सरकारला घेरण्याच्या तयारीत; आंदोलनांद्वारे देशभरात रान पेटवणार

देशातील आर्थिक स्थितीबाबत काँग्रेसकडून १ ते ८ नोव्हेंबर या काळात केंद्र सरकारविरोधात ३५ पत्रकार परिषदा घेण्यात येणार आहे.

संग्रहित छायाचित्र

देशातील बिकट आर्थिक परिस्थितीवर सरकारकडून योग्य उपाययोजना केल्या जात नसल्याने सरकारविरोध काँग्रेस मोठे आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहे. येत्या ५ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर या काळात सरकारविरोधात देशभरात हे आंदोलन केले जाणार आहे. एएनआयने याबाबत ट्विटद्वारे माहिती दिली आहे.

एनआयच्या वृत्तानुसार, देशातील आर्थिक स्थितीबाबत काँग्रेसकडून १ ते ८ नोव्हेंबर या काळात केंद्र सरकारविरोधात ३५ पत्रकार परिषदा घेऊन देशाची आर्थिक स्थिती जनतेसमोर मांडण्यात येणार आहेत. त्याचबरोबर ५ ते १५ नोव्हेंबर या दहा दिवसांच्या काळात देशभरात ठिकठिकाणी आंदोलनेही करण्यात येणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2019 6:02 pm

Web Title: congress will hold protests in nov against central government over economic situation aau 85
Next Stories
1 ‘अलिबाबा’प्रमाणे वर्चस्वाची अंबानींची तयारी, 1.6 लाख कोटींची योजना तयार
2 युरोपियन युनियन प्रतिनिधीमंडळाच्या काश्मीर दौऱ्यावरुन विरोधकांची सरकारवर टीका
3 दिल्लीतल्या पहिल्या टी-२० सामन्यावर अतिरेकी हल्ल्याचं सावट, भारतीय संघाच्या सुरक्षेत वाढ
Just Now!
X