22 May 2018

News Flash

भाजपाला आणखी एक धक्का, गोव्यात काँग्रेस करणार सत्तास्थापनेचा दावा

कर्नाटकमधील घडामोडीनंतर आता काँग्रेसने गोव्यात सत्तास्थापनेचा दावा करण्याचा निर्णय घेतला आहे. गोव्यात २०१७ च्या निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाले होते.

मनोहर पर्रिकर

कर्नाटकमध्ये राज्यपाल वजूभाई वाला यांनी सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाला सत्तास्थापनेची संधी दिल्यानंतर आता काँग्रेसने गोव्यात भाजपाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसचे गोव्यातील प्रभारी चेल्ला कुमार हे गोव्यातील राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत.

कर्नाटकमध्ये भाजपा १०४ जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष ठरला. पण सत्तास्थापनेसाठी आवश्यक असलेले ११२ जागांचे पाठबळ त्यांच्याकडे नाही. दुसरीकडे काँग्रेस ७८ आणि जनता दल सेक्यूलर या पक्षाला ३७ जागा मिळाल्या आहेत. या दोन्ही पक्षांनी निवडणुकोत्तर युती करुन सत्तास्थापनेचा दावा केला. पण कर्नाटकमध्ये राज्यपाल वजूभाई वाला यांनी भाजपाला सत्तास्थापनेची संधी दिली. संख्याबळानुसार भाजपा हा सर्वात मोठा असल्याने त्यांना संधी देण्यात आली असून १५ दिवसांत त्यांना बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.

कर्नाटकमधील घडामोडीनंतर आता काँग्रेसने गोव्यात सत्तास्थापनेचा दावा करण्याचा निर्णय घेतला आहे. गोव्यात २०१७ च्या निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक जागांवर विजय मिळाला होता. काँग्रेसला १७ जागा आणि भाजपाला १२ जागा असताना भाजपाने मगोप आणि अन्य पक्षांशी युती करून सत्ता पटकावली होती. त्यामुळे कर्नाटकनुसार आता गोव्यातही सर्वात मोठ्या पक्षाला सत्तास्थापनेची संधी द्यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. यासंदर्भात गोव्याचे काँग्रेसचे प्रभारी छेला कुमार हे शुक्रवारी राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा करतील. काँग्रेसच्या या निर्णयामुळे भाजपाची आता कोंडी होण्याची शक्यता आहे.

First Published on May 17, 2018 4:57 pm

Web Title: congress will meet goa governor tomorrow says single largest party be invited
 1. Mangesh Deo
  May 17, 2018 at 11:03 pm
  गोव्यात सध्या एक लोकनियुक्त सरकार अस्तित्वात असून, उत्तमपणे कार्यरत आहे. अशा परिस्थितीत नव्याने सरकार स्थापनेचा दावा करणे हे न्यायालयीन व्यवस्थेचा कालापव्यय करणारे ठरेल. त्या ऐवजी अस्तित्वातील सरकारला विधानसभागॄहात अविश्वासठराव आणून आव्हान देणे अधिक संयुक्तित ठरेल. पण तशी हिंमत नसल्यानेच कदांचित घडलेल्या घटनेचं राजकीय भांडवल करून फक्त आकांडतांडव करायचेच ठरवले असेल, तर मग सारे धन्यच आहे.
  Reply
  1. Purushottam Dayama
   May 17, 2018 at 8:37 pm
   राहुल गाँधीला सोडा पण लोकसत्तेला थोडीफार अक्कल असावी। BJP ने सत्तेवर आल्यानंतर विधानसभेत आपले बहुमत अनेक वेळा सिद्ध केले मग आता कांग्रेस्सला सत्तास्थापनाचा प्रश्न येतो कुठे? फ़ारतर ते HC किंवा SC मद्धये जावू शकतात।
   Reply