News Flash

काँग्रेस लोकसभा विरोधी पक्ष नेते पदासाठी दावा करणार नाही – सुरजेवाला

लोकसभेत विरोधी पक्ष नेते पदासाठी ५४ सदस्यांची आवश्यकता असते

रणदीपसिंह सुरजेवाला

एकीकडे देशात नव्या सरकारने कामकाजाची सुत्र हाती घेतली आहेत. मात्र, दुसरीकडे काँग्रेस लोकसभा विरोधी पक्ष नेते पदासाठी दावा करणार नाही, असे काँग्रेस प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी सांगितले आहे. यासंदर्भात सुरजेवाला म्हणाले की, लोकसभेत विरोधी पक्ष नेते पदासाठी १० टक्के म्हणजेच ५४ सदस्यांची आवश्यकता असते. आमच्याकडे पुरेसे संख्याबळ नाही म्हणुनच आमचे संख्याबळ ५४ होईपर्यंत आम्ही विरोधी पक्ष नेते पदासाठी दावा करणार नाही. आम्ही ही जबाबदारी सरकारवरच सोडली आहे. त्यामुळे आता त्यांनीच ठरवायचे आहे की एखाद्या पक्षाला विरोधी पक्ष नेते पद द्यायचे की नाही.

देशभरातील लोकसभेच्या ५४३ जागांपैकी या निवडणुकीत काँग्रेसला केवळ ५२ जागांवरच विजय मिळाला आहे. लोकसभेच्या विरोधी पक्ष नेते पदासाठी ५४ जागांची आवश्यकता असते, त्यामुळे काँग्रेसला दोन जागा कमी पडत आहेत. भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात या लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवत, तब्बल ३०३ जागांवर विजय मिळवला आहे.

काँग्रेसच्या नवनिर्वाचित लोकसभा सदस्यांची शुक्रवारी पहिली बैठक झाली. या बैठकीत सोनिया गांधा यांची चौथ्यांदा काँग्रेसच्या संसदीय नेतेपदी निवड करण्यात आली. सोनिया गांधी २०१४ पासून या पदावर आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2019 3:48 pm

Web Title: congress will not stake a claim to the leader of opposition
Next Stories
1 राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल अडचणीत, ‘ईडी’ने बजावले समन्स
2 ऑगस्टा वेस्टलँड : सुशेन गुप्ताला सशर्त जामीन
3 ३०० जागा जिंकलात म्हणून मनमानी करु शकत नाही; ओवेसी मोदींवर बरसले
Just Now!
X