‘..तेव्हा कॉंग्रेसला आनंद साजरा करण्याची कारणे मिळणार नाहीत’
फुटलेल्या ‘पनामा पेपर्स’मधील माहितीनुसार अनेक भारतीय करचोरीत गुंतले असल्याबाबत एक बहुसंस्था गट तपास करत असतानाच, या प्रकरणाचे तपशील उघड होतील त्यावेळी काँग्रेसला ‘आनंद साजरा करण्याची’ कारणे मिळणार नाहीत, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे.
या प्रकरणाचा तपास ‘अतिशय नि:पक्षपणे’ करण्यात येत असल्याचे सांगून, आपण या प्रकरणातून स्वत:ला दूर करावे ही काँग्रेस व आम आदमी पक्षाने केलेली मागणी जेटली यांनी फेटाळून लावली.
फुटलेल्या कागदपत्रांमध्ये नाव असलेल्या एका व्यक्तीशी जेटली यांचे ‘जवळचे संबंध’ असल्यामुळे त्यांनी या तपासातून बाजूला व्हावे अशी विरोधी पक्षांची मागणी आहे याकडे लक्ष वेधले असता, ‘मला त्यांचे म्हणणे कळलेले नाही’ असे उत्तर जेटलींनी दिले.
या तपासाच्या निष्पक्षतेबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना जेटली म्हणाले, की बहुसंस्था गटामार्फत या प्रकरणाचा तपास अतिशय नि:पक्षपणे सुरू आहे.
ज्यावेळी या माहितीचे तपशील उघड होतील तेव्हा काँग्रेसला आनंद साजरा करण्याची कारणे मिळणार नाहीत.