News Flash

कोर्टाचा निकाल सचिन पायलट यांच्या बाजूने लागल्यास? काँग्रेसचा प्लॅन ‘बी’ तयार

राजस्थानात गेल्या आठवडाभरापासून मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उप मुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला

आमदारांना अपात्र ठरवण्यासंबंधीच्या प्रकरणात कोर्टाचा निकाल काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांच्या बाजूने लागल्यास काय? याचा विचारही आता काँग्रेसने सुरू केल्याचे दिसते. त्यासाठी वेगळ्या पर्यायाची म्हणजेच प्लॅन बीचीही तयारी काँग्रेसने सुरू केल्याचे कळते. या प्रकरणावर सोमवारी होण्याची शक्यता आहे.

आपण कोणतंही पक्षविरोधी कृत्य केलं नसल्याचं सांगत सचिन पायलट गटानं गेल्या आठवड्यात काँग्रेसला कोर्टात खेचलं होतं. त्या प्रकरणावर उद्या सुनावणीची शक्यता आहे. या प्रकरणाचा निकाल कोर्टानं सचिन पायलट यांच्या बाजूने दिल्यास अधिवेशन बोलवण्याची तयारी असल्याचं काँग्रेसच्या लीगल टीममधील सूत्रांनी सांगितल्याचं वृत्त एनडीटीव्हीनं दिलं आहे.

काय आहे रणनीती?
काँग्रेसचा दावा आहे की, अधिवेशनाच्या काळात मुख्यमंत्री आपल्याकडील संख्याबळ सिद्ध करतील. कारण, काँग्रेसकडे तेवढं आमदारांचं संख्याबळही आहे. काँग्रेसच्या बाजूने मतदान करण्यासाठी व्हिप काढला जाईल. त्यामुळे प्रत्येक काँग्रेस आमदाराला मुख्यमंत्री गेहलोत यांच्या सरकारच्या बाजून मत द्यावं लागेल.

आणखी वाचा – राज्यस्थानमध्ये नवीन राजकीय अंक, मुख्यमंत्री राज्यपालांना भेटले आणि… 

पायलट यांच्या गटानं विरोधात मतदान केल्यास?
काँग्रेसनं व्हिप काढल्यानंतर जर पायलट यांच्या गटानं गेहलोत यांच्या विरोधात मतदान केल्यास, त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.

सध्या स्थिती काय?
सध्या पायलट आणि त्यांच्या सोबत असलेल्या एकूण १८ आमदारांना नोटीस पाठवण्यात आली आहे. सध्या हे आमदार अदृश्य स्थळी आहेत. त्यामुळे त्यांच्या घराबाहेर ही नोटीस चिटकवण्यात आली आहे. शिवाय त्यांना मेसेज आणि व्हॉट्सअपवरही नोटीस पाठवण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2020 2:10 pm

Web Title: congresss plan b in rajasthan if court favours sachin pilot nck 90
Next Stories
1 दिल्लीतील थरारक दृश्य : नाल्याच्या पाण्यात वाहून गेलं दुमजली घर
2 राज्यस्थानमध्ये नवीन राजकीय अंक, मुख्यमंत्री राज्यपालांना भेटले आणि…
3 बॉलिवूड दिग्दर्शक रजत मुखर्जी यांचे निधन
Just Now!
X