जगभरातील बाजाराचा परिणाम देशातील स्थानिक सराफ बाजारावर झाल्याचा दिसून आला. सोन्याचा दर मंगळवारी ५० रूपयांनी घसरून ३१,२०० प्रति १० ग्रॅम राहिला. दरम्यान, चांदीच्या दरात किंचितशी वाढ दिसून आली. चांदीचा दर १५० रूपयांनी वाढून ३७,८५० प्रति किलोग्रॅम इतका झाला. जागतिक बाजारातील परिणामांमुळे सोन्याचे दर घसरल्याचे सराफ व्यावसायिकांना म्हटले आहे.

स्थानिक दागिने निर्माते आणि किरकोळ विक्रेत्यांकडून मागणी घटल्यामुळे बाजारात सोन्याचा दर घसरला. दिल्लीतील सराफ बाजारात ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याच्या किंमतीत ५०-५० रूपयांची घसरण दिसून आली. त्यांचे दर क्रमश: ३१,२०० आणि ३१,०४० रूपये प्रति १० ग्रॅम असा राहिला. सोमवारी सोन्याचा दर १०० रूपयांनी घसरला होता. तर ८ ग्रॅम सोन्याच्या नाण्याचा दर २४,५०० रूपयांवर स्थिर राहिला.

दुसरीकडे चांदीच्या दरात सुधारणा दिसून आली. चांदी १५० रूपयांच्या तेजीने ३७,८५० रूपये प्रति किलोग्रॅम झाला.