News Flash

लसपुरवठय़ासाठी सातत्याने प्रयत्न -मोदी

मोठय़ा प्रमाणात लशी उपलब्ध व्हाव्यात यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत,

| May 19, 2021 12:32 am

उपाययोजनांत स्थानिक अधिकाऱ्यांना निर्णयस्वातंत्र्य

नवी दिल्ली : करोनाविरुद्धच्या लढय़ात राज्यातील आणि जिल्ह्य़ातील अधिकारी हे ‘फिल्ड कमांडर’ आहेत, असे नमूद करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, स्थानिक स्तरावर प्रतिबंधक क्षेत्र जाहीर करून चाचण्यांची व्याप्ती वाढविणे आणि जनतेला योग्य आणि परिपूर्ण माहिती देणे ही करोनावर मात करण्याचे मार्ग आहेत, असे मंगळवारी सांगितले. लशींचा पुरवठा मोठय़ा प्रमाणावर व्हावा यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत, असेही ते म्हणाले.

नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नऊ जिल्ह्य़ांतील ४६ जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. आपल्या स्थानिक गरजांप्रमाणे तुम्हाला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असल्याचे या वेळी मोदी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले आणि धोरणात्मक बदल केल्यास त्याची माहिती कोणत्याही दबावाखाली न येता द्यावी, असेही ते म्हणाले. लसीकरण हा करोनाशी लढण्याचा योग्य मार्ग आहे, त्यामुळे त्याबाबत ज्या अफवा पसरल्या आहेत त्याचे सामूहिकपणे उच्चाटन केले पाहिजे, असेही ते म्हणाले.

१५ दिवस अगोदर रूपरेषा

मोठय़ा प्रमाणात लशी उपलब्ध व्हाव्यात यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत, राज्यांना लसीकरणाच्या कार्यक्रमाची रूपरेषा १५ दिवस अगोदरच देण्याचे प्रयत्न सुरू आहेत, तसे झाल्यास त्यानुसार राज्यांना तयारी करणे सुलभ होईल. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चाचण्या, उपचार, नियमांचे पालन करणे गरजेचे आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.

या वेळी मोदी यांनी संबंधित अधिकाऱ्यांचे कौतुक केले. अनेकांनी स्वत: करोनाबाधित असतानाही काम केले, तर काही जणांच्या कुटुंबातील सदस्याचे निधन झाले तरीही त्यांनी आपल्या कर्तव्याला प्राधान्य दिले, असे मोदी म्हणाले. करोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये अधिक लक्ष द्यावे लागेल, असेही पंतप्रधान म्हणाले. या बैठकीला अनेक मुख्यमंत्रीही हजर होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2021 12:32 am

Web Title: consistent efforts for vaccine supply says narendra modi zws 70
Next Stories
1 इस्राएलवरील हल्ल्यात थायलंडचे कामगार ठार
2 परमबीर सिंह यांची याचिका : सुनावणीतून न्या. गवई यांची माघार
3 अमेरिकेकडून लवकरच जगभरात आठ कोटी लसमात्रांचा पुरवठा