लखनऊ : कृषी कायद्यांच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप समाजवादी पक्षाचे नेते व उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केला आहे.

त्यांनी ट्विट संदेशात म्हटले आहे की, आपल्या जमिनी हिसकावण्याचे केंद्राचे हे कारस्थान आहे हे शेतकऱ्यांना कळून चुकले आहे . कृषी कायदे हा केवळ जुमला असून त्यात शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे खोटे आश्वासन दिले आहे. आमचा  लढा हा किमान आधारभूत भाव मिळणे, बाजारपेठ व कृषी क्षेत्राला फायदा मिळावा यासाठी आहे. पण भाजप हे सोडून सगळे काही करीत आहे.  यादव यांनी सांगितले की, जर शेतकऱ्यांना बाजारपेठेच्या भरवशावर सोडले तर त्यांना फायदा होणार नाही कारण बडे व्यापारी त्याचा गैरफायदा घेतील.