News Flash

केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांविरुद्धची अवमानाची कार्यवाही स्थगित

केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांविरुद्ध सुरू केलेल्या न्यायालयीन अवमान कार्यवाहीला सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी स्थगिती दिली.

दिल्लीला प्राणवायू पुरवण्याच्या निर्देशांची अवहेलना केल्याचे प्रकरण

राजधानी दिल्लीतील करोनाबाधित रुग्णांसाठी ७०० मेट्रिक टन प्राणवायू पुरवण्याच्या निर्देशांचे पालन न केल्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांविरुद्ध सुरू केलेल्या न्यायालयीन अवमान कार्यवाहीला सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी स्थगिती दिली.

तथापि, या स्थगितीमुळे कोविड-१९ व्यवस्थापनाशी संबंधित मुद्द्यांवर देखरेख ठेवण्यास उच्च न्यायालयावर कुठलेही निर्बंध असणार नाहीत असे न्या. धनंजय चंद्रचूड व न्या. एम.आर. शहा यांच्या खंडपीठाने सांगितले.

दिल्लीला होणारा प्राणवायूचा पुरवठा वाढवण्याच्या विविध पैलूंवर विचार करण्यासाठी केंद्र व दिल्ली सरकार यांच्या अधिकाऱ्यांची बैठक बुधवारी सायंकाळपर्यंत आयोजित केली जावी, असे निर्देश न्यायालयाने घेतलेल्या तातडीच्या सुनावणीत दिले. ही देशभरातील महासाथीची परिस्थिती असून, आम्ही दिल्लीच्या लोकांना उत्तरदायी असल्यामुळे या शहराला प्राणवायूचा पुरवठा निश्चित करण्यासाठी आम्हाला मार्ग शोधावे लागतील, असे खंडपीठ म्हणाले.

‘आम्हीही दिल्लीतच राहात आहोत. आम्हीही असहाय आहोत आणि नागरिकांना कोणत्या परिस्थितीतून जावे लागत आहे याची आम्ही कल्पना करू शकतो’, असे नमूद करतानाच आपल्या कार्यालयाला वकिलांसह इतर लोक मदतीसाठी साकडे घालत असल्याचे न्या. चंद्रचूड यांनी सांगितले.

३० एप्रिलच्या आपल्या आदेशाचा आपण फेरविचार करू शकत नाही आणि दिल्लीला दररोज ७०० टन प्राणवायू पुरवण्यासाठी केंद्राला प्रयत्न करावाच लागेल. एवढा पुरवठा कसा सुरळीत केला जाईल याबाबतचा आराखडा गुरुवार सकाळपर्यंत आपल्यासमोर सादर करावा, असे निर्देश न्यायालयाने केंद्राला दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 6, 2021 12:52 am

Web Title: contempt proceedings against central government officials adjourned akp 94
Next Stories
1 धार्मिक मिरवणूक काढल्याप्रकरणी गुजरातमध्ये २३ अटकेत
2 रुग्णालयांतील आगीच्या घटनांमुळे अग्निसुरक्षा तपासणीचे आदेश
3 सीरमच्या मदतीने ऑक्सफर्डची मलेरिया लस निर्मिती
Just Now!
X