कर्नाटक विधानसभेत कालपासून सुरू असलेले राजकीयनाटक आजही सुरूच आहे. मुख्यमंत्री कुमारस्वामी सरकारवर बहूनत सिद्ध करण्याचा दबाव कायम आहे. यासाठी आता आज सायंकाळी सहा वाजेर्यंतची त्यांना मुदत देण्यात आली आहे. या अगोदर त्यांना आज दुपारी दीड वाजेपर्यंत बहूमत सिद्ध करण्याची मुदत देण्यात आली होती.

यादरम्यान कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी पुन्हा एकदा बहूमत सिद्ध करण्याची वेळ निश्चित केली आहे. राज्यापालांनी फ्लोर टेस्टसाठीच्या वेळेची निश्चिती करत सांगितले की, मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी सायंकाळी ६ वाजेच्या अगोदर बहूमत सिद्ध करावे. खरेतर या अगोदर गुरूवारीच बहूनत सिद्ध करण्याची मुदत देण्यात आली होता. त्यानंतर शुक्रवीर दीड वाजेची वेळ दिल्या गेली मात्र या वेळेतही मुख्यमंत्री कुमारस्वामींना बहुमत सिद्ध करता आले नाही. आता सायंकाळी सहा पर्यंत बहुमत सिद्ध होणार की नाही? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

विशेष म्हणजे बहुमत सिद्ध करण्यास एवढा कमी कालवधी असूनही सत्ताधारी युती सरकारने राज्यपालांच्या अधिकारांबाबत प्रश्न निर्माण केला होता. याबाबत मुख्यमंत्री कुमारस्वामींनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देत सांगितले की, राज्यपाल विधीमंडळ लोकपालच्या भूमिकेत काम करू शकत नाहीत. तसेच ते म्हणाले की, मी राज्यपालांचा अपमान करत नाही आणि विधानसभा अध्यक्ष के आर रमेश कुमार यांना विनंती करतो की, राज्यापालांना यासाठी कालमर्यादा ठरवण्याचे अधिकार आहे की नाही, हे निश्चित करावे . यानंतर काँग्रेसच्या सदस्यांनी राज्यपाल परत जा, अशी घोषणाबाजी सुरू केली.