12 August 2020

News Flash

डिजिटल अर्थव्यवस्थेसाठी सहकार्य आणि दहशतवादाविरोधात ‘ब्रिक्स’ परिषदेत भर – मोदी

मोदी मंगळवारी दुपारी ब्राझीलला रवाना झाले असून ते १३ आणि १४ नोव्हेंबर रोजी ११ व्या ब्रिक्स परिषदेला हजर राहणार आहेत

(संग्रहित छायाचित्र)

ब्राझीलला रवाना; आज आणि उद्या चर्चा

डिजिटल अर्थव्यवस्था, विज्ञान आणि तंत्रज्ञान त्याचप्रमाणे दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी एकमेकांना सहकार्य करणारी यंत्रणा उभारणे या प्रश्नांवर ब्रिक्स शिखर परिषदेत मुख्यत्वे प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ब्रिक्स परिषदेला रवाना होण्यापूर्वी स्पष्ट केले.

मोदी मंगळवारी दुपारी ब्राझीलला रवाना झाले असून ते १३ आणि १४ नोव्हेंबर रोजी ११ व्या ब्रिक्स परिषदेला हजर राहणार आहेत. भारत आणि ब्राझील यांच्यातील धोरणात्मक सहभाग वाढविण्याबाबत मोदी ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोल्सोनारो यांच्याशी चर्चा करणार आहेत.

ब्रिक्सअंतर्गत सहकार्य वृद्धिंगत करणे मुख्यत्वे उज्ज्वल भवितव्यासाठी आर्थिक वृद्धी या संकल्पनेवर मोदी अन्य ब्रिक्स नेत्यांशी चर्चा करणार आहेत. शिखर परिषदेत जगातील पाच मोठय़ा अर्थव्यवस्था विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य वाढविण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवणार आहेत, असेही ते म्हणाले.

त्याचप्रमाणे डिजिटल अर्थव्यवस्था आणि दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी एकमेकांना सहकार्य करण्यासाठी ब्रिक्सच्या चौकटीत राहून यंत्रणा उभारण्यावरही चर्चा केली जाणार आहे. ब्रिक्स उद्योग मंचासमोर आपले भाषण होणार असून ब्रिक्स व्यापार परिषद आणि न्यू डेव्हलपमेण्ट बँकेशीही चर्चा करणार असल्याचे मोदी म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2019 1:08 am

Web Title: cooperation for the digital economy and the brics conference on terrorism abn 97
Next Stories
1 सत्तानाटय़ात शहांची जाणीवपूर्वक शांतता
2 राजस्थान सरकार पाहुणचारात गर्क!
3 आंध्र प्रदेशात सर्व तेलुगु शाळा आता इंग्रजी माध्यमाच्या
Just Now!
X