News Flash

सलाम! वडिलांच्या मृत्यूनंतरही महिला पोलीस अधिकाऱ्याकडून स्वातंत्र्यदिनाच्या परेडचं नेतृत्त्व

दु:खाचा डोंगर कोसळला असतानाही महिला अधिकाऱ्याने निभावलं कर्तव्य

स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी आयोजित परेडचं नेतृत्त्व करण्याची जबाबदारी असतानाच आदल्या दिवशी वडिलांचा मृत्यू झाला. दु:खाचा डोंगर कोसळला असतानाही महिला अधिकाऱ्याने मात्र कर्तव्याला प्राथमिकता दिली आणि नियोजित कार्यक्रमात कोणताही अडथळा येऊ न देता परेडचं नेृत्त्व केलं. एन महेश्वरी असं या तामिळनाडूमधील महिला अधिकाऱ्याचं नाव आहे.

एन महेश्वरी या थिरुनवल्ली जिल्ह्यात सशस्त्र राखीव पोलिस निरीक्षक पदावर काम करतात. वडिलांच्या मृत्यूचं दु:ख असतानाही एन महेश्वरी यांनी परेडला हजेरी लावली. स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित या परेडमध्ये जिल्हाधिकारी शिल्पा प्रभाकर सतीश आणि पोलिस अधीक्षक एन मनीवन्नन यांचा गार्ड ऑफ ऑनर देऊन सत्कार होणार होता.

महेश्वरी यांच्या ८३ वर्षीय वडिलांचं १४ ऑगस्टला निधन झालं. ते गेल्या बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. महेश्वरी यांना १४ ऑगस्टच्या रात्री वडिलांच्या निधनाची माहिती मिळाली. थिरुनवल्ली येथून २०० किमी अंतरावर असणाऱ्या गावी अंत्यसंस्कार विधी पार पडले.

महेश्वरी यांच्या वडिलांच्या निधनाची माहिती मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री पनीरसेल्वम यांनी शोक व्यक्त केला. महेश्वरी यांनी कर्तव्य निभावण्यासाठी परडेचं नेतृत्त्व केल्याचं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2020 12:00 pm

Web Title: cop leads independence day parade day even after her fathers death in tamil nadu sgy 87
Next Stories
1 काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला; दोन सीआरपीएफ जवान, एसपीओ शहीद
2 मशिदीत गाण्याचा व्हिडीओ; अभिनेत्री सबा कमरसह अन्य कलाकारांवर गुन्हा दाखल
3 भाजपाबाबत नरमाईच्या ‘त्या’ वृत्तावर फेसबुकनं केला खुलासा
Just Now!
X