News Flash

#CAA: तुझी दाढी खेचून काढू, पत्रकार ओमर राशिदचा पोलिसांच्या ताब्यात असतानाचा अनुभव

मी आंदोलक नाही पत्रकार आहे हे तो वारंवार पोलिसांना सांगत होता.

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात उत्तर प्रदेशच्या वेगवेगळया भागांमध्ये हिंसक विरोध प्रदर्शने सुरु आहेत. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर लखनऊमध्ये पोलिसांनी आंदोलनाशी संबंध नसलेल्या एका पत्रकाराला ताब्यात घेऊन त्रास दिल्याचे समोर आले आहे. ओमर राशिद असे या पत्रकाराचे नाव आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधातील हिंसक आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचा आरोपाखाली लखनऊ पोलिसांनी ओमर राशिदला ताब्यात घेतले होते. मी आंदोलक नाही पत्रकार आहे हे तो वारंवार पोलिसांना सांगत होता. पण पोलिसांवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. लखनऊ पोलिसांनी कुठलेही सबळ कारण न देता ओमर राशिदला ताब्यात घेतले.

पोलिसांनी त्याला मारहाण करण्याची तसेच तुझी दाढी खेचून काढू अशी धमकी दिली. मी पत्रकार आहे हे तो, वारंवार सांगत होता. त्यावर तुझी पत्रकारीता, तुझ्याकडे ठेव असे पोलिसांनी त्याला सुनावले. ओमर राशिद ‘द हिंदू’ दैनिकासाठी काम करतो. उत्तर प्रदेश मुख्यमंत्री कार्यालयाने हस्तक्षेप केल्यानंतर ओमर राशिदची दोन तासांनी सुटका झाली. तो पर्यंत पोलिसांनी आपल्याला बराच त्रास दिला असे ओमर राशिद म्हणाला.

मागच्या रविवारी दिल्लीच्या जामिया विद्यापीठात सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलनाला बसलेल्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी कारवाई केल्यानंतर देशभरात या आंदोलनाने जोर पकडला. उत्तर प्रदेशच्या वेगवेगळया भागांमध्ये हिंसक आंदोलनांमध्ये काही जणांचा मृत्यू झाला आहे. ओमर राशिदला पोलिसांच्या ताब्यात असताना आलेला अनुभव सोशल मीडियावर मोठया प्रमाणात शेअर केला जात आहे.

ओमर राशिदची पार्श्वभूमी काश्मीरची असून त्यावरुन लखनऊ पोलिसांनी त्याला लक्ष्य केले. ‘तू काश्मिरींनी लपवून ठेवले आहेस, ते कुठे आहेत त्याची माहिती दे’ असे पोलीस त्याला विचारत होते. माझ्यासोबत ताब्यात घेतलेल्या एका आंदोलकाला पोलिसांनी मारहाण केली असे ओमर राशिदने सांगितले. एका पोलीस अधिकाऱ्याने तर, ” विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे दिली नाहीत तर, तुझी दाढी खेचून काढेन व तुला मारहाण करेन” अशी धमकी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2019 1:35 pm

Web Title: cop said he would tear out my beard lucknow journalist omar rashid dmp 82
Next Stories
1 विसरू नका २००२ मध्ये काय झालं; कर्नाटकातील मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य
2 CAA मुळे देशाच्या धार्मिक ऐक्यावर गदा येण्याची शक्यता -पवार
3 CAA : “वाजपेयी असते, तर भाजपाला राजधर्माची आठवण करुन दिली असती”
Just Now!
X