05 April 2020

News Flash

‘करोना’चा परिणाम : चीनमधील औषधी कंपन्या बंद; भारतात पॅरासिटामॉलच्या किंमतीत वाढ

पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पुरवठा सुरळीत झाला नाही तर ....

चीनमध्ये करोना विषाणूचा मोठय़ा प्रमाणावर फैलाव झाला आहे. याचे पडसाद आता भारतात देखील जाणवत आहेत. ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार चीनमधुन पुरवठा खंडीत झाल्याने भारतात पॅरासिटामॉल औषधांच्या किंमतीत जवळपास ४० टक्के वाढ झाली आहे.

जायडस कॅडिला कंपनीचे चेअरमन पंकज पटेल यांनी सांगितले आहे की, जंतु संसर्गाच्या उपचारासाठी वापरली जाणारी एंटीबायोटीक एजिथ्रोमाइसीनच्या किंमती ७० टक्क्यांनी वाढल्या आहेत. जर पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चीनमधुन पुरवठा सुरळीत झाला नाही तर संपूर्ण फार्मा इंडस्ट्रीत इंग्रिडिएंट्सचा तुटवडा निर्माण होऊ शकतो.

अॅक्टिव फार्मास्युटिकल्स इंग्रिडिएंट्स (एपीआय) च्या आयातीसाठी भारत मोठ्याप्रमाणवर चीनवर अवलंबून आहे. कोणत्याही औषधाच्या निर्मितीसाठी एपीआय महत्वाचा घटक आहे. डायरेक्ट्रेट जनरल ऑफ कमर्शिअल इंटेलिजंस अॅण्ड स्टॅस्टिक्सनुसार २०१६-१७ मध्ये भारताने एपीआय गटात तब्बल १९ हजार ६५३.२५ कोटी रुपयांची आयात केली. यामध्ये चीनचा हिस्सा ६६.६९ टक्के होता. तर २०१७-१८ दरम्यान भारताची आयात २१ हजार ४८१ कोटी रुपये होती. ज्यामध्ये चीनचा हिस्सेदारीत वाढ होऊन ती ६८.३६ टक्के झाली होती. २०१८-१९ मध्ये एपीआय आणि ठोक प्रमाणातील औषधींच्या आयातीचे प्रमाण २५ हजार ५५२ कोटी रुपये झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2020 7:16 pm

Web Title: corona effect pharmaceutical companies closed in china paracetamol price rise in india msr 87
Next Stories
1 “मासिक पाळीच्या काळात स्वयंपाक करणारी महिला पुढच्या जन्मी होईल कुत्री”
2 S-400 सिस्टिम वेळेत देण्याचा रशियाचा शब्द, संरक्षण व्यवहार १६ अब्ज डॉलरच्या घरात
3 ‘…तर भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध अटळ’
Just Now!
X