News Flash

पंतप्रधानांचा जी-७ दौरा रद्द

ब्रिटनमधील कॉर्नवॉल येथे ११ ते १३ जून या कालावधीत जी-७ देशांची शिखर परिषद होणार आहे.

पंतप्रधानांचा जी-७ दौरा रद्द

नवी दिल्ली : देशात करोनाचा प्रादुर्भाव असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्यात ब्रिटनमध्ये होणाऱ्या जी-७ शिखर परिषदेसाठी जाणार नसल्याचे मंगळवारी परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

ब्रिटनमधील कॉर्नवॉल येथे ११ ते १३ जून या कालावधीत जी-७ देशांची शिखर परिषद होणार आहे. या परिषदेसाठी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी मोदी यांना विशेष निमंत्रित म्हणून निमंत्रण दिले होते. मात्र करोना स्थितीमुळे मोदी जी-७ परिषदेसाठी जाणार नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 12, 2021 1:02 am

Web Title: corona emerges in the country prime minister narendra modi akp 94
Next Stories
1 केरळ : भूमी सुधारणांच्या अग्रणी के. आर. गौरी अम्मा कालवश
2 अमेरिकेत १२ वर्षांवरील मुलांसाठीही लस
3 भारतातील उत्परिवर्तनाचा जगाला धोका
Just Now!
X