News Flash

Coronavirus : पंतप्रधान मोदींनी आवाहन केलेला जनता कर्फ्यू काय आहे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना येत्या २२ मार्चला जनता कर्फ्यूचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

“इतिहासात याआधी देश आणि समाज एकमेकांच्या विरोधात उभे राहत होते. पण आज संपूर्ण जग मिळून एका आव्हानाचा सामना करत आहे. त्यामुळे भविष्यात एकत्रित आणि लवचीकपणा महत्त्वाचा असणार आहे,” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. (संग्रहित फोटो)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना येत्या २२ मार्चला जनता कर्फ्यूचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. लोकांनी येत्या रविवारी २२ मार्चला स्वत:हून सकाळी सात ते रात्री नऊ पर्यंत घराबाहेर न पडता या जनता कर्फ्यूचे पालन करावे. ही आपली परीक्षा आहे. करोना व्हायरसविरोधात लढण्यासाठी आपण कितपत तयार आहोत हे सुद्धा यातून समजेल असे मोदी म्हणाले.

हॉस्पिटल, विमानतळावर आज लाखो लोक सेवा बजावत आहेत. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता हे काम ते करत आहेत. त्यांना करोनाची बाधा होण्याची जास्त शक्यता असूनही ते हे काम करत आहेत.

व्हायरस आणि देश यामध्ये ते आपले रक्षणकर्ते आहेत अशा लोकांप्रती कृतज्ञता म्हणून २२ मार्च रोजी संध्याकाळी पाच वाजता लोकांनी दरवाजे उघडून, खिडकीमध्ये उभे राहून त्या सर्वांचे घंटी, थाळी आणि टाळया वाजवून कृतज्ञतेची भावना व्यक्त करावी असे मोदी म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2020 8:41 pm

Web Title: corona fear pm modi address nation appeal people to follow janta curfew dmp 82
Next Stories
1 पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ‘जनता कर्फ्यू’ची घोषणा
2 निर्भया प्रकरण: सगळ्या आरोपींच्या याचिका फेटाळल्या, उद्या होणार फाशी
3 Coronavirus: आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद करण्याचा मोठा निर्णय
Just Now!
X