News Flash

‘करोना कवच’ ऑफर… साडीबरोबर मिळणार मॅचिंग मास्क, सॅनिटायझर, काढा पावडर आणि औषधं

टॅगलाइन आहे, 'साडी विकत घ्या आणि करोनाशी लढा'

साडी विकत घेतल्यानंतर साडीच्या मास्क, सॅनिटायझर, आयुर्वेदिक काढ्याची पावडर आणि होमिओपॅथिक औषधं सापडली तर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. नाही का? मात्र करोनाचा प्रसार थांबवण्यासाठी आणि त्यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी सूरतमधील एका कापड उद्योजकाने ही आगळीवेगळी संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. साडी विकत घ्या आणि करोनाशी लढा अशा टॅगलाइनसहीत कापड विक्रेत्याने मोहिम सुरु केली आहे. अन्य काही साडी विक्रेत्यांनीही या उपक्रमाअंतर्गत विक्री सुरु केली आहे.

मेड इन सूरत साडी विकत घेताना साडी व्यापारी ग्राहकांना ‘करोना कवच’ नावाच्या ऑफरबद्दल सांगतात. ही ऑफरमध्येच काही खास साड्यांवरील ऑफर असून. या साडीच्या बॉक्समध्ये महिलांना साडीच्या रंगाशी मॅचिंग होणारे मास्क, सॅनिटायझर, आयुर्वेदिक काढ्याची पावडर आणि होमिओपॅथिक औषध असतात. या सर्वांचा उपयोग करोनाविरुद्ध लढण्यासाठी होणार असल्याने या ऑफरला ‘करोना कवच’ असं नाव देण्यात आल्याचं ‘न्यूज १८ हिंदी’ने आपल्या वृत्तामध्ये म्हटलं आहे.

देशातील प्रमुख कापड उद्योगांची केंद्र असणाऱ्या शहरांमध्ये सूरतचा समावेश होतो. सूरतच्या साड्या देशभरामध्ये प्रसिद्ध आहेत. त्यामुळेच करोनाच्या काळात साड्यांची विक्री वाढवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग विक्रेत्यांकडून केले जात आहेत. काही विक्रेत्यांनी साड्यांचा खप वाढवण्यासाठी साडी विक्रीच्या व्यवसायाला थेट जनजागृती मोहिमेशी जोडलं आहे. बरं हे एकाच ठिकाणी सुरु आहे असं नाही तर ग्रामीण भागांपासून ते शहरांपर्यंत हीच परिस्थिती दिसून येत आहे.

प्रत्येक महिलेला साडी आवडते. त्यामुळेच प्रत्येक घरामध्ये एक साडी जरी विकत घेण्यात आली तरी या मोहिमेमुळे करोनासंदर्भातील जनजागृतीला हातभार लागेल असं व्यापाऱ्यांच मत आहे. साडीबरोबर देण्यात येणाऱ्या करोनापासून बचाव करणाऱ्या गोष्टींसाठी अतिरिक्त पैसे घेतले जात नाहीत. साडीबरोबर या वस्तू मोफत दिल्याप्रमाणे दिल्या जात आहेत. या साड्यांची किंमत ५०० पासून पाच हजार रुपयांपर्यंत आहे.


या साड्यांना राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बिहारमधून चांगली मागणी असल्याचे व्यापारी सांगतात. अशाप्रकारच्या ३० हजार साड्यांची विक्री करण्यात आल्याचा दावा व्यापाऱ्याने केला असून दोन लाख साड्यांची ऑर्डर आल्याचे एका व्यापाऱ्याने सांगितले आहे. या मोहिमेच्या मागे जनजागृतीचा हेतू असल्याचे सांगण्यात येत असले तरी या मोफत देण्यात येणाऱ्या करोना कवचमुळे साडी विक्रेत्यांची चर्चा मात्र जोरात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2020 2:04 pm

Web Title: corona kavach saree in surat scsg 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 “लॉकडाउन संपल्यानंतर…”, लडाखमधील शहीद जवानाने कुटुंबाला दिलेला ‘तो’ शब्द अखेरचा ठरला
2 ५ रुपयाच्या नाण्यावरुन टोल कर्मचाऱ्यांना मारहाण, दोन कर्मचारी गंभीर जखमी
3 …म्हणून चीन लपवतोय गलवान खोऱ्यात ठार झालेल्या सैनिकांची संख्या
Just Now!
X