14 August 2020

News Flash

भारतात करोना मृत्यूदर सर्वात कमी

देशभरात एकूण २० हजार १६० मृत्यू

संग्रहित प्रतिकात्मक छायाचित्र

भारतात एक लाख लोकसंख्येमागे करोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण जगात सर्वात कमी असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, भारतात हे प्रमाण १४.२७ असून जगभरातील सरासरी प्रमाण ६८.२९ इतके आहे. देशभरात एकूण २० हजार १६० मृत्यू झाले आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेच्या ६ जुलै रोजी प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, इराण, मेक्सिको, ब्राझील, पेरू, अमेरिका, फ्रान्स, इटली, स्पेन आणि ब्रिटन या देशांमध्ये एक लाख लोकसंख्येमागे अनुक्रमे १३७, २३५, ३०२, ३१५, ३९१, ४५६, ५७६, ६०७ आणि ६५१ मृत्यू झाले आहेत. भारतात एक लाखामागे ५०५ करोनाबाधित आहेत तर, जगभरात लाखामागे सरासरी १४५३ व्यक्तींना करोनाची बाधा झाली आहे. हे प्रमाण चिलीमध्ये सर्वाधिक जास्त म्हणजे १५,४५९, पेरूमध्ये ९,०७० तर अमेरिका, ब्राझील, स्पेन, रशिया, ब्रिटन, इटली, मेक्सिको या देशांमध्ये एक लाख लोकसंख्येमागे अनुक्रमे ८५६०, ७४१९, ५३५८, ४७१४, ४२०४, ३९९६ आणि १९५५ इतके लोक करोना बाधित झाले.

रुग्णसंख्येचा ७ लाखांचा टप्पा पार

देशात करोनाबाधितांची एकूण संख्या ७ लाख १९ हजार ६६५ झाली असून एकूण मृत्यू २० हजार १६० झाले आहेत. गेल्या चोवीस तासांमध्ये २२ हजार २५२ नव्या रुग्णांची भर पडली तर, ४६७ मृत्यू झाले. सलग पाच दिवस प्रतिदिन २० हजारांपेक्षा जास्त नव्या रुग्णांची नोंद झाली. करोनाचे रुग्ण वाढत असले तरी, ४ लाख ३९ हजार ९४७ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. गेल्या चोवीस तासांमध्ये १५ हजार ५०० रुग्ण बरे झाले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६१ टक्क्यांवर पोहोचले आहे. २ लाख ५९ हजार ५५७ रुग्ण उपचाराधीन आहेत. करोनाच्या रुग्णसंख्येत भारताने रशियाला मागे टाकले असून अमेरिका व ब्राझील हे दोन देशांत भारतापेक्षा जास्त रुग्ण आहेत. गेल्या चोवीस तासांमध्ये २ लाख ४१ हजार ४३० नमुना चाचण्या झाल्या. एकूण १ कोटी २ लाख ११ हजार ९२ चाचण्या करण्यात आल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2020 12:11 am

Web Title: corona mortality is lowest in india abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 कानपूर चकमकीची दंडाधिकारी चौकशी
2 प्रियंका गांधी-वढेरा यांची उत्तर प्रदेश सरकारवर टीका
3 महिला अधिकाऱ्यांना लष्करात ‘कायम नियुक्ती’ देण्यास मुदतवाढ
Just Now!
X