News Flash

करोना पॉझिटिव्ह महिलेनं उपवास करण्यास नकार दिल्यानं रुग्णालयाच्या इमारतीवरून घेतली उडी

करवा चौथसाठी उपवास करण्यास मनाई केल्याने आत्महत्या

करोना पॉझिटिव्ह महिलेनं उपवास करण्यास मनाई केल्यानं दिल्यानं टोकाचं पाऊल उचललं. महिलेनं रुग्णालयाच्या इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केली. उत्तर प्रदेशातील इटावा येथील सैफई वैद्यकीय विद्यापाठामध्ये ही घटना घडली. महिलेची करोना झाल्यानं दाखल करण्यात आलं होतं.

मयत महिलेची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने तिला रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यामुळे तिला करवा चौथसाठी उपवास करता आला नाही. उपवास करण्यास मनाई केल्याने या महिलेने रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. मैनपुरी जिल्ह्यातील रहिवासी असलेली ही महिला मेंदूच्या आजाराने ग्रस्त होती. त्यामुळे तिला २७ ऑक्टोबरला महिलांच्या न्यूरो-सर्जरी विभागात उपचारासाठी दाखल केले होते. दरम्यान, २९ ऑक्टोबरला तिची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्याने तेव्हा तिला रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील आयसोलेशन वॉर्ड मध्ये हलविण्यात आलं होतं.

तिसऱ्या मजल्यावरून उडी घेतल्यानंतर या महिलेचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये आत्महत्या केल्याची ही पहिलीच घटना नाही. २०१६ मध्ये एका कैद्यानेही इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. २०१७ मध्ये रूग्णालयातीलच एका क्षयरोगग्रस्त रूग्णानं आजारपणाला कंटाळून आत्महत्या केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2020 1:54 pm

Web Title: corona positive woman jumped from the hospital building after refusing to fast abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 अल्पवयीन मुलाने विवाहित महिलेवर बलात्कार करुन सोशल मीडियावर अपलोड केला व्हिडीओ
2 व्हाइट हाऊसची शर्यत जिंकण्यासाठी बायडेन यांना हवी फक्त सहा मतं, ती ‘या’ राज्यातून मिळू शकतात
3 US Election 2020 : ट्रम्प-बायडेन समर्थक भिडले; अमेरिकेत तीव्र संघर्षाची चिन्हं; यंत्रणा High Alert वर
Just Now!
X