News Flash

करोना, म्युकरमायकोसिसचे इंजेक्शन चोरणाऱ्या सहा जणांना अटक

एका एमबीबीएस डॉक्टरसह इतर ५ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

लखनौ : करोना आणि काळ्या बुरशीवरील उपचारांसाठी आवश्यक असलेल्या इंजेक्शन्सची चोरी करून ती चढ्या दराने रुग्णांच्या नातेवाईकांना विकणाऱ्या एका एमबीबीएस डॉक्टरसह इतर ५ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

या सहा जणांना येथील राफेयाम क्लबनजीक अटक करण्यात आली. त्यांच्याजवळून २८ लायपोसोमल अँफोटेरिसिन-बी इंजेक्शन आणि १८ रेमडेसिविर इंजेक्शन जप्त करण्यात आले. यांच्यापैकी डॉ. वामिक हुसेन हा एमबीबीएस डॉक्टर असून, मोहम्मद रकीब, मोहम्मद आरिफ, मोहम्मद इम्रान, राजेश कुमार सिंह व बलवीर सिंह हे निरनिराळ्या रुग्णालयांमध्ये काम करणारे वॉर्डबॉय आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त डी.के. ठाकूर यांनी दिली. हे आरोपी रुग्णालयांमधून इंजेक्शन चोरत असत आणि ते नंतर चढ्या दराने रुग्णांच्या नातेवाईकांना विकत असत, असेही पोलिसांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2021 12:01 am

Web Title: corona six arrested for stealing mucormycosis injections akp 94
Next Stories
1 डिजिटल नियमांचे पालन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न; ट्विटरचे आश्वासन
2 टीव्ही अभिनेत्यानं Facebook Live मध्येच केला आत्महत्येचा प्रयत्न! चाहत्यामुळे वाचला जीव!
3 American Research: घरात विनामास्क बोलण्याने करोना पसरण्याचा जास्त धोका
Just Now!
X