05 April 2020

News Flash

प्रयोगशाळेतूनच ‘करोना’चा प्रसार

प्रयोगशाळांचा इतिहास तपासला असता तेथूनच विषाणू पसरल्याचे सूचित होते असे शोधनिबंधात म्हटले आहे

चिनी वैज्ञानिकांच्या शोधनिबंधात धक्कादायक दावा

करोना विषाणूचा प्रसार वुहान येथील प्राण्यांच्या बाजारपेठेतून नव्हे तर  तेथून जवळच असलेल्या एका प्रयोगशाळेतून  झाल्याचे चिनी वैज्ञानिकांनी म्हटले आहे. चीनमध्ये बरीच माहिती हळूहळू बाहेर  येत असून वुई चॅटमधून ही धक्कादायक बाब सामोरी आली आहे.

चीनच्या विज्ञान अकादमीने हा दावा फेटाळला आहे. जीवशास्त्रज्ञ बोटाओ झियाओ व ली झियाओ यांनी ‘दी पॉसिबल ओरिजिन्स ऑफ २०१९ एनसीओव्ही करोना व्हायरस’ हा  शोधनिबंध सादर केला आहे. वुहानमध्ये सागरी अन्नाची बाजारपेठ असली तरी तेथून जवळच दोन प्रयोगशाळा आहेत. त्या प्रयोगशाळांचा इतिहास तपासला असता तेथूनच विषाणू पसरल्याचे सूचित होते असे शोधनिबंधात म्हटले आहे. हा विषाणू वटवाघळातून माणसात आला, पण तो वुहान येथील सागरी अन्न बाजारपेठेतील वटवाघळातून पसरला असे चिनी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. बाजारपेठेत वटवाघळे नव्हती, असे शोधनिबंधात म्हटले आहे. या प्रयोगशाळेत वटवाघळांना होणाऱ्या रोगांवर प्रयोग सुरू होते व त्यातून हा विषाणू पसरला आहे, कारण जो पहिला रुग्ण आहे तो कधीच वुहानच्या प्राणी बाजारपेठेत गेलेला नव्हता मग त्याच्यात विषाणू कुठून आला हा प्रश्न अनुत्तरित होता. एका आजारी वटवाघळाने संशोधकांवर हल्ला केला, त्यात एका महिलेचाही समावेश होता. या वटवाघळाचे रक्त, लघवी त्यांच्या अंगावर पडले होते.

वुहान प्रयोगशाळेने शक्यता फेटाळली

वुहान इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरॉलॉजीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आमच्या प्रयोगशाळांमध्ये ‘पातळी चार’ प्रकारची सुरक्षा असून जी माहिती बाहेर आली आहे ती खरी नाही. ज्या महिला विषाणूतज्ज्ञाच्या संदर्भाने ही माहिती दिली आहे ती २०१५ मध्येच येथून निघून गेली आहे असा प्रयोगशाळेचा दावा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2020 1:04 am

Web Title: corona spread from the laboratory akp 94
Next Stories
1 भारतविरोधी कारवायांमुळेच ब्रिटिश खासदाराचा व्हिसा रद्द
2 डायमंड प्रिन्सेस जहाजावरील ५०० जणांची आज सुटका
3 बंगाली अभिनेते तपस पॉल यांचे निधन
Just Now!
X