News Flash

अमित शहांसारख्या नेत्यांमुळेच पसरतोय करोना, शेतकरी नेते राकेश टिकैत यांची टीका

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आज टिकैत यांनी ममता बॅनर्जी यांची भेट घेतली.

शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली आहे. (संग्रहित छायाचित्र)

शेतकरी नेते राकेश टिकैत सध्या पश्चिम बंगालमध्ये असून त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान शेतकरी आंदोलनाचं स्वरुप, बंगालमधल्या शेतकऱ्यांच्या समस्या आणि त्यांच्या विषयांवर चर्चा झाली. पत्रकारांशी बोलताना टिकैत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली आहे.

जेव्हा पत्रकारांनी त्यांना विचारलं की शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून करोना पसरत नाही का? त्यावेळी टिकैत म्हणाले, आम्ही कुठलीही मोठी बैठक घेत नाही, ज्याने करोना पसरु शकतो. आम्ही सगळेजण करोना नियमांचं पालन करुन आंदोलन करत आहोत. पश्चिम बंगाल निवडणुकांच्या वेळी करोनाचा भरपूर प्रसार झालेला असून ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आणि अमित शाह यांच्या बैठका झाल्या आणि त्यामुळे करोना अजूनच पसरला.

टिकैत यांनी पत्रकारांनाच विचारलं, जेव्हा बंगालमध्ये केंद्र सरकार स्वतः प्रचार करत होतं तेव्हा करोना पसरत नव्हता का? ममता बॅनर्जी नंदिग्राममधून निवडणूक लढत आहे हेही आपल्याला माहित नव्हतं असं टिकैत यांनी सांगितलं.

तुम्हीही ममता यांच्या प्रचारात सहभागी होता असं विचारल्यावर टिकैत म्हणाले, आम्ही प्रचार केला म्हणूनच आम्ही त्यांच्यासमोर आमच्या मागण्या मांडत आहोत. आम्हाला असं वाटत आहे की विरोधी पक्षांनी आमच्या सोबत यावं आणि केंद्र सरकारवर शेतकरी कायद्यासंदर्भात दबाव टाकावा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2021 5:43 pm

Web Title: corona spreading with leaders like amit shah said rakesh tikait vsk 98
Next Stories
1 चीनसोबत स्पर्धा करण्यासाठी अमेरिकन सिनेटची २४६ बिलियन डॉलरच्या विधेयकाला मंजुरी
2 शेतकऱ्यांसाठी अच्छे दिन; MSP संदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय
3 करोना लस प्रमाणपत्रातील चुका कशा सुधाराल, जाणून घ्या…
Just Now!
X