01 March 2021

News Flash

पुण्यात करोना लसीचा पहिला डोस घेणारे डॉ. विनोद शहा म्हणतात….

पुणे शहरातील पहिली लस कमला नेहरू रुग्णालयात.....

मागच्या नऊ महिन्यापासून जगभरात ज्या करोना विषाणूने थैमान घातले, त्या आजारावरील लस आजपासून देशभरात देण्यास सुरुवात झाली आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर आज पुणे शहरातील पहिली लस कमला नेहरू रुग्णालयात 74 वर्षीय डॉ विनोद शहा यांना देण्यात आली. त्यानंतर शहा यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, “माझ्यासह अनेक जण लसीच्या प्रतिक्षेत होतो. आज अखेर ती प्रतीक्षा संपली असून आज मी लस घेतल्याने मला प्रचंड आनंद झाला आहे.” तसेच ही लस प्रत्येकाने घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

पुणे शहरातील महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल आणि आरोग्य कर्मचाऱ्याच्या उपस्थितीमध्ये सुरुवात झाली. शहरातील पहिल्या लसीचे 74 वर्षीय डॉ. विनोद शहा लाभार्थी ठरले असून त्यांच्यासह एकाच वेळी तिघांना देण्यात आली आहे. तर पहिल्या तासाभरात दहा जणांना लस देण्यात आली आहे.

लस दिल्यानंतर डॉ. विनोद शहा यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, “ज्या वेळी करोना विषाणूंचे रुग्ण आढळत होते. तेव्हा कोणत्या व्यक्तीना आजार होऊ शकतो. याबाबत माहिती मिळाल्यानंतर माझ वय तर 74 असल्याने मला आधिक धोका असल्याचे वाटले. त्यावर मी कुटुंबीय सह सुरुवातीचे दोन महिने बाहेर गावी गेलो. तरी देखील मी माझ्या रुग्णाच्या सेवेत ऑनलाईनच्या माध्यमातून होतो. थोडसा कालावधी झाल्यावर पुन्हा रूग्णालयात जाऊन सेवा देण्यास सुरवात केली. पण आपल एवढ वय लक्षात घेता आणि इतर आजार असल्याने मला हा आजार होऊ शकतो. अशी भीती होती. मात्र प्रत्येक नियमांचे पालन करून आजारापासून दूर राहण्यात यशस्वी ठरलो आहे. पण त्याच दरम्यान लस लवकरच येणार अशी चर्चा सूर झाली आणि त्याचे काही परिणाम होतील असे बोलले गेले. पण मी ताप येणार याच्यासह काही त्रास जाणवेल. मात्र ही लस घेण्यासाठी कोणी ही घाबरू नका.” सर्वांना लस घेण्याचे त्यांनी आवाहन केले. ते पुढे म्हणाले की, “मी लस घेऊन तास झाला आहे. मला कोणताही त्रास जाणवत नसल्याचे त्यांनी सांगितले”.

आजचा दिवस माझ्या दृष्टीने आनंदाचा : महापौर मुरलीधर मोहोळ
गेल्या अनेक महिन्यांपासून करोना लसीच्या प्रतिक्षेत होतो. आज लस देण्यास सुरुवात झाली आहे. तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या आदेशानुसार प्रत्येकाला लस दिली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आजवर ज्या प्रकारे काळजी घेतली आणि प्रत्येक नियमांचे पालन केले. त्यानुसार या पुढील काळात देखील काळजी घेण्याचे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले. त्याचबरोबर आजचा दिवस माझ्या दृष्टीने आनंदाचा असल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे शहरातील 8 ठिकाणी लसीकरणाला सुरुवात, कमला नेहरू रुग्णालयात पहिल्या तासात 10 जणांना दिली लस

राजीव गांधी रुग्णालय, येरवडा, कमला नेहरू रुग्णालय, मंगळवार पेठ, ससून रुग्णालय, पुणे स्टेशन, सुतार दवाखाना, कोथरूड, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, एरंडवणा, रूबी हॉल क्लीनिक, ताडीवाला रस्ता, नोबल हॉस्पिटल, हडपसर, भारती हॉस्पिटल धनकवडी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2021 12:58 pm

Web Title: corona vaccination drive started in india in pune first vaccine got to doctor vindo shah svk 88 dmp 82
Next Stories
1 कोणत्याही अफवांना बळी पडू नका, कारण…; मोदींनी विरोधकांनाही दिलं प्रत्युत्तर
2 काही जण कधीच घरी परतले नाहीत, असं म्हणताच पंतप्रधानांचा कंठ आला दाटून
3 लसीकरणाबद्दल पंतप्रधान मोदींचं नागरिकांना महत्त्वाचं आवाहन; म्हणाले…
Just Now!
X