करोना व्हायरसविरोधात सुरु असलेल्या लस संशोधनात अमेरिका, ब्रिटन या देशांना मागे सोडून रशियाने मोठी आघाडी घेतलीय. अमेरिका आणि ब्रिटनच्या लसीची खूप चर्चा आहे पण या दोन देशांच्याआधी रशियाची लस बाजारात येईल अशी स्थिती आहे. त्यामुळे अमेरिकेचं अस्वस्थ होणं सहाजिक आहे, यावरुन जगात एक नवीन राजकारण सुरु झालंय. त्या राजकारणाचा आणि रशियाच्या लस संशोधन कार्यक्रमाचा आपण आढावा घेणार आहोत.

सध्या संपूर्ण जगाला एकच प्रश्न पडला आहे. करोना व्हायरसवर लस कधी येणार? कारण या व्हायरसने सगळयांचीच जीवन जगण्याची पद्धत बदलून टाकली आहे. घराबाहेर पाऊल टाकण्याआधी माणस आज दहा वेळा विचार करतायत. कारण एकदा का, या व्हायरसने शरीरात शिरकाव केला, तर नेमके त्याचे काय परिणाम होतील हे कोणीच सांगू शकत नाही.