News Flash

Corona Vaccine Shortage: राजस्थानची पण तक्रार, पंतप्रधानांकडे त्वरीत पुरवठ्याची मागणी

दोन दिवसांत राज्यातील लसींचा साठा संपेल असं सांगितलं आहे.

संग्रहीत

देशात एकीकडे करोनाचा संसर्ग वाढत आहे. दिवसेंदिवस करोनाबाधितांची संख्येत मोठी भर पडत आहे. तर दुसरीकडे लसीकरण मोहीम सुरू आहे. मात्र आता या लसीकरण मोहीमेत काहीसा अडथळा निर्माण होत असल्याचं समोर येत आहे. कारण, महाराष्ट्रात लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक ठिकाणी लसीकरण थांबवण्यात आले आहे. तसेच, केंद्र सरकारकडे देखील महाराष्ट्र सरकारकडून लसींचा पुरवठा वाढण्याबाबत मागणी करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र सरकार पाठोपाठ आता राजस्थानने देखील लसींच्या तुटवड्याचा मुद्दा मांडला आहे. शिवाय, तत्काळ लसींचा पुरवठा करण्याची केंद्र सरकारकडे मागणी केली आहे.

या संदर्भात पंतप्रधान मोदींनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पत्र लिहून, राज्यात दोन दिवसांत लसींचा साठा संपेल, तरी आणखी ३० लाख डोस पाठवले जावेत. अशी मागणी केली आहे.

देशात आत्तापर्यंत नेमकं किती लसीकरण झालंय? केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली सविस्तर आकडेवारी!

गेल्या काही दिवसांपासून करोना लसीच्या डोसचा तुटवडा हा चर्चेचा विषय ठरला आहे. महाराष्ट्रासह काही राज्यांनी लसीचे पुरेसे डोस केंद्राकडून येत नसल्याची तक्रार देखील केली आहे. या पार्श्वभूमीवर देशात नेमकं किती लसीकरण झालंय? डोस खरंच कमी पडले आहेत का? याविषयी प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रश्नांना आता खुद्द केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी उत्तर दिलं असून देशात आत्तापर्यंत झालेल्या लसीकरणाची सविस्तर आकडेवारीच त्यांनी मांडली आहे. त्यासोबतच, गेल्या २ महिन्यांत देशात मोठ्या प्रमाणावर करोना रुग्ण वाढले असून लोकांचं बेजबाबदार वर्तन त्याला कारणीभूत ठरल्याचं देखील आरोग्यमंत्री यावेळी म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी सादर केलेल्या आकडेवारीमध्ये आत्तापर्यंत दिलेले डोस, कुणाला किती डोस मिळाले, किती आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण पूर्ण झालं आहे याविषयी माहिती देण्यात आली आहे.

११ ते १४ एप्रिल दरम्यान लसमहोत्सव!

दरम्यान, करोना संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असताना अनेक राज्यांमध्ये प्रशासन शिथिल झाल्याचे दिसत आहे असे सांगतानाच; करोनाचा फैलाव ‘युद्धपातळीवर’ रोखण्यासाठी पुढील दोन-तीन आठवडे ठामपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केले. जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यासाठी ११ ते १४ एप्रिल दरम्यान ‘लस महोत्सव’ आयोजित करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2021 5:53 pm

Web Title: corona vaccine shortage rajasthan also complains demands immediate supply to pm msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 प्रिन्स फिलिप यांचं वयाच्या ९९व्या वर्षी निधन
2 Rafale Deal : “कोणताही घोटाळा झालेला नाही”, फ्रान्सच्या Dassault ने फेटाळले आरोप!
3 धक्कादायक! करोनाऐवजी तीन महिलांना दिली रेबीजची लस, चूक लक्षात येताच…
Just Now!
X