22 September 2020

News Flash

हिमाचल प्रदेशमध्ये लॉकडाउनची घोषणा

करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी लॉकडाउनची घोषणा केली आहे.

संग्रहित छायाचित्र

करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी हिमाचल प्रदेशमध्ये अनिश्चित काळासाठी लॉकडाउन करण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी सोमवारी विधानसभेमध्ये ही घोषणा केली. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

लोकांनी घाबरु नये, कुठल्याही संकटाचा सामना करण्यासाठी सरकार पूर्णपणे सज्ज आहे. पुढील आदेशापर्यंत लॉकडाउन कायम राहील असे जयराम ठाकूर म्हणाले. या दरम्यान राज्यात अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत. रविवारी कांगडा जिल्ह्यात करोना व्हायरसचे दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.

‘लॉक डाऊन’ म्हणजे काय?
दुर्मिळ वेळा ‘लॉक डाऊन’सारखा पर्याय स्वीकारला जातो. ‘लॉक डाऊन’मध्ये नागरिकांना आपला परिसर सोडून दुसरीकडे जाण्यास मज्जाव केला जातो. संभाव्य धोक्याची तीव्रता लक्षात घेऊन ‘लॉक डाऊन’चा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्याचबरोबर हा निर्णय किती कालावधीसाठी ठेवायचा हे संबंधित स्थितीवर अवलंबून आहे. सध्या अशी तरी असा निर्णय सरकारच्या विचाराधीन नाही. मात्र, रुग्णांची संख्या वाढली, तर हा लॉक डाऊन महाराष्ट्रात लागू केला जाऊ शकतो.

इटली आणि स्पेनमध्ये लॉक डाऊन लागू करण्यात आलं आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना घरात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अन्न आणि औषध खरेदी, रुग्णालय, बँक किंवा बालक आणि वृद्धांची काळजी घेण्यासाठी घर सोडण्याची मुभा देण्यात आली आहे. वुहानमध्येही ‘कोरोना’चा उगम झाल्यानंतर परिस्थिती चिंताजनक झाल्यानं ‘लॉक डाऊन’ करण्यात आलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 23, 2020 12:20 pm

Web Title: corona virus crisis lockdown in himachal pradesh dmp 82
Next Stories
1 भिती आणि चिंतेच्या वातावरणातही सणासारखी स्थिती निर्माण केली, संजय राऊतांचा मोदींवर हल्लाबोल
2 आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करा; केंद्राचे राज्य सरकारांना आदेश
3 गुजरातमध्ये ९३ जणांकडून होम क्वारंटाइनचे उल्लंघन, १० जणांविरोधात FIR
Just Now!
X