करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी बाजार, दुकाने, हॉटेल्स बंद ठेवण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळाची स्थिती असून नागरीक जीवनावश्यक वस्तुंचा साठा करुन ठेवत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणाता नागरीकांना महत्वाचे आवाहन केले आहे.

साठेबाजी करु नका. दूध, औषधे आणि अन्न याची कमतरता निर्माण होणार नाही. त्यासाठी आवश्यक पावले आम्ही उचलली आहेत.

साठेबाजी न करण्याची मी तुम्हाला विनंती करतो. आधी ज्या प्रमाणे वस्तुंची खरेदी करत होता, तशीच खरेदी सुरु ठेवा असे मोदी म्हणाले.