News Flash

धोकादायक! गुजरातच्या साबरमती नदीत आढळला करोना व्हायरस

गुजरातमधील अहमदाबादच्या मध्यभागी असलेल्या साबरमतीच्या पाण्याचे नमुने घेण्यात आले होते. या सर्वांमध्ये करोनाचा संसर्ग आढळून आला आहे.

करोनाबाबत रोज काहीतरी नवीन खुलासे होता आहेत ( photo indian express)

देशात करोनाची दुसरी लाट आता हळूहळू ओसरताना दिसत आहे. मात्र संकट अजून टळलेले नाही. करोनाबाबत रोज काहीतरी नवीन खुलासे होता आहेत. अशीच एक घटना गुजरातमधून समोर आली आहे, जिथे सर्वात महत्वाच्या नदी साबरमती नदीत करोना विषाणू आढळल्याची नोंद करण्यात आली आहे. अहमदाबादच्या मध्यभागी असलेल्या साबरमतीच्या पाण्याचे नमुने घेण्यात आले होते. या सर्वांमध्ये करोनाचा संसर्ग आढळून आला आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.

साबरमती व्यतीरीक्त अहमदाबादचे दोन मोठे तलाव कांकरिया आणि चांदोला मध्येही करोना विषाणूचे जीवाणू आढळले आहेत. साबरमतीपूर्वी गंगा नदीशी जोडलेल्या वेगवेगळ्या सांडपाण्यामध्ये देखील करोना विषाणूचे संसर्गित जीवाणू आढळले. आता नैसर्गिक पाण्यातही करोनाचे विषाणू दिसू लागल्याने चिंता वाढली आहे.

हेही वाचा- तबलिगी जमात प्रकरण : तीन न्यूज चॅनेल्सना दंड; प्रेक्षकांची माफी मागण्याचे निर्देश

आयआयटी गांधीनगरने अहमदाबादमधील साबरमती नदीतून पाण्याचे नमुने घेतले होते. त्यांचा अभ्यास केला गेला, प्राध्यापक मनीष कुमार यांच्या म्हणण्यानुसार, तपासणी दरम्यान करोना विषाणू पाण्याच्या नमुन्यातून सापडला जो अतिशय धोकादायक आहे. पृथ्वी व विज्ञान विभागाचे प्राध्यापक असलेले मनीष कुमार म्हणाले की, पाण्याचे नमुने दर आठवड्यात ३ सप्टेंबर ते २९ डिसेंबर २०२० या काळात नदीतून घेण्यात आले. नमुना घेतल्यानंतर याची तपासणी केली गेली आणि करोना विषाणूचे संसर्गित जीवाणू आढळले.

साबरमती नदीतून ६९४ नमुने, कांकरिया तलावातील ५४९ आणि चांदोला तलावामधून ४०२ नमुने घेण्यात आले. या नमुन्यांमध्ये करोना विषाणू आढळला आहे. नैसर्गिक पाण्यातही विषाणू टिकू शकतो, असा विश्वास संशोधनात व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे देशातील सर्व नैसर्गिक जल स्त्रोतांचे नमुने घ्यावे, कारण व्हायरसचे बरेच गंभीर म्यूटेशन करोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये दिसून आले आहेत, असे मनीषकुमार म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2021 11:58 am

Web Title: corona virus found in sabarmati river in gujarat srk 94
टॅग : Corona,Coronavirus
Next Stories
1 १८ वर्षांवरील नागरिकांना मोफत लस देणार; नरेंद्र मोदींची घोषणा
2 तबलिगी जमात प्रकरण : तीन न्यूज चॅनेल्सना दंड; प्रेक्षकांची माफी मागण्याचे निर्देश
3 ९२ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये पूर्ण लसीकरणानंतरही आढळली करोनाची सौम्य लक्षणे; अभ्यासातून माहिती समोर
Just Now!
X