देशात करोनाप्रतिबंधासाठी ११ एप्रिल ते १४ एप्रिल दरम्यान लसीकरण उत्सव आयोजित करण्यात आला असून ती लसीकरणाच्या विरोधातील दुसरी लढाई आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी विषाणूचा सामना करण्यासाठी नागरिकांना रविवारी  अनेक सूचना केल्या. व्यक्तिगत सुरक्षा व सामाजिक आरोग्य यावर भर देण्याची गरज आहे असे ते म्हणाले.

त्यांनी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, की लोकांनी चार गोष्टी ध्यानात ठेवाव्यात. त्यात, प्रत्येकाने लस घ्यावी, प्रत्येक रुग्णावर उपचार व्हावेत, प्रत्येकाने कुणाला तरी वाचवावे. वयस्कर लोक व जे लोक जास्त शिकलेले नाहीत त्यांना लस घेण्यास मदत करा. ज्या लोकांकडे उपचारासाठी पैसे व माहिती यांचा अभाव आहे त्यांना मदत करा. मुखपट्टी परिधान करून स्वत:चे व इतरांचे जीव वाचवा. कुटुंबे व त्यातील सोसायटीच्या सदस्यांनी सूक्ष्म प्रतिबंधक क्षेत्रे तयार करावीत. जेथे कुणी रुग्ण संसर्गित असेल तेथेच असे करावे. बाकी ठिकाणी नाही. त्यातून देशात रोगाशी लढा देणे सोपे जाईल कारण आपल्या देशाची लोकसंख्या जास्त आहे. सूक्ष्म प्रतिबंधक क्षेत्राबाबत जागरूकता राखण्याची गरज आहे. गरज नसताना घराबाहेर पडू नये. जे लशीसाठी पात्र आहेत त्यांनी लस घ्यावी. मुखपट्टी, साबणाने हात धुणे हे नियम पाळावेत. लस वाया जाता कामा नये, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.

सरकारच्या धोरणामुळे घबराट- काँग्रेस</strong>

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या करोना धोरणामुळे देशातील जनतेत भीती व घबराटीची  भावना निर्माण झाली आहे, तसेच अर्थव्यवस्थाही धोक्यात आली आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे. मोदी सरकारचे धोरण उर्मटपणाचे व अकार्यक्षम असल्याचेही काँग्रेसने म्हटले आहे.

एकही लस वाया गेली तरी एका रुग्णाला ती मिळणार नाही हे समजून चला. देशाच्या लसीकरण क्षमतेचा जास्तीत जास्त वापर करण्याची गरज आहे. त्यातून आपली क्षमता आणखी वाढवण्याची गरज आहे. लोकसहभागातून, जागरूकतेतून आपण आपली जबाबदारी पार पाडू शकतो. त्यातूनच आपण करोनावर मात करू शकू. नरेंद्र मोदी, पंतप्रधान