देशात गेल्या २४ तासांत करोनाच्या ४३ हजार ५०९ नव्या रुग्णांची नोंद झाली असून आतापर्यंत एकूण ३ कोटी १५ लाख २८ हजार ११४ जणांना करोनाची लागण झाली आहे. तर सलग दुसऱ्या दिवशी उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असल्याचे गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीत म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशात गेल्या २४ तासांत ६४० जणांचे मृत्यू झाले असून देशभरात आतापर्यंत एकूण करोनाबळींची संख्या ४ लाख २२ हजार ६६२ झाली आहे. तर उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत ४४०४ ने वाढ होऊन ती ४ लाख ३ हजार ८४० इतकी झाली आहे. एकूण रुग्णांच्या तुलनेत उपचाराधीन रुग्णांची संख्या १.२८ टक्के इतकी आहे. तर करोनामुक्त होण्याची टक्केवारी ९७.३८ इतकी आहे. दैनंदिन रुग्णवाढीच्या दरात वाढ होऊन तो २.५२ टक्के झाला आहे, तर साप्ताहिक रुग्णवाढीचा दर २.३८ इतका नोंदला असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीत म्हटले आहे.

आतापर्यंत एकूण ३ कोटी ७ लाख १ हजार ६१२ जण करोनामुक्त झाले असून मृत्यू दर १.३४ इतका नोंदला गेला आहे. बुधवारी १७ लाख २८ हजार ७९५ चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत ४६ कोटी २६ लाख २९ हजार ७७३ चाचण्या करण्यात आल्या आहेत. देशभरात एकूण ४५.०७ कोटी जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.

More Stories onकरोनाCorona
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corona virus infection corona positive patient akp 94
First published on: 30-07-2021 at 02:13 IST