देशात करोना रुग्णसंख्येत किंचित वाढ झाली असून रुग्णसंख्या पुन्हा ३० हजारांवर गेली आहे. गेल्या २४ तासांत ३०,५७० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४३१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत घट झाली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी जाहीर केले आहे.

उपचाराधीन रुग्णांची संख्या ३ लाख ४२ हजार ९२३  झाली आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण रुग्णसंख्येच्या १.०३ टक्के इतकी नोंदली गेली आहे. गेल्या २४ तासांत सक्रिय रुग्णांची संख्या ८१६४ ने कमी झाली आहे.

देशभरात आतापर्यंत एकूण ३ कोटी ३३ लाख ४७ हजार ३२५ जणांना करोनाची लागण झाली आहे. तर करोनाबळींची एकूण संख्या ४ लाख ४३ हजार ९२८ झाली आहे. तर मृत्यू दर १.३३ टक्के नोंदला गेला असल्याचे  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीत म्हटले आहे. सर्वाधिक २०८ मृत्यू केरळमध्ये, ७६ गोव्यात तर ५६ महाराष्ट्रात झाले आहेत.

करोनामुक्त होण्याची टक्केवारी ९७.६४ इतकी झाली आहे. आतापर्यंत ३ कोटी २५ लाख ६० हजार ४७४ जण करोनामुक्त झाले आहेत. बुधवारी १५ लाख ७९ हजार ७६१ चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत एकूण ५४ कोटी ७७ लाख ०१ हजार ७२९ चाचण्या करण्यात आल्या आहेत.  दैनंदिन रुग्णवाढीचा दर १.९४ टक्के नोंदला गेला आहे. आतापर्यंत लसीकरण झालेल्यांची  संख्या ७६.५७ कोटी झाली आहे.