News Flash

लस तुटवड्याचा आरोप खोडून काढा

लसमात्रांचा तुटवडा असल्यामुळे लसीकरण केंद्रे बंद होऊ  लागल्याची तक्रार राज्य सरकारांकडून केली जात आहे

मोदींचा भाजपच्या खासदारांना आदेश
नवी दिल्ली : करोना प्रतिबंधक लशींच्या तुटवड्याचा आरोप करून काँग्रेस देशभर नकारात्मक वातावरण तयार करत असून त्यांचे मनसुबे मोडून काढा. काँग्रेसचा लस तुटवड्याचा आरोप खोडून काढा. लोकांपर्यंत केंद्र सरकारचे काम पोहोचवा, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत केली. हे केले नाही तर ही पोकळी विरोधक खोटेपणाने भरून काढतील, असा इशाराही त्यांनी पक्षाच्या खासदारांना दिला.

लसमात्रांचा तुटवडा असल्यामुळे लसीकरण केंद्रे बंद होऊ  लागल्याची तक्रार राज्य सरकारांकडून केली जात आहे पण, केंद्र सरकारने लशींच्या तुटवड्याचा आरोप फेटाळून लावला आहे. काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी सातत्याने केंद्राला लक्ष्य बनवले आहे. या पार्श्वभूमीवर मोदींनी भाजपच्या खासदारांना करोनाच्या प्रश्नावरून लोकांमध्ये पक्षाची बाजू आक्रमकपणे मांडण्याचा सल्ला दिला.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2021 12:06 am

Web Title: corona virus infection corona positive patient corona vaccine bjp mp akp 94
Next Stories
1 करोना उपाययोजनांवर जागतिक बँकेचा १५७ अब्ज डॉलर खर्च
2 मुंबई हल्लाप्रकरणी राणाच्या प्रत्यार्पणास अमेरिका अनुकूल
3 Pegasus Spyware : “…हे काम संजय राऊतांनी बंद करावं”, फडणवीसांचा खोचक सल्ला!
Just Now!
X