News Flash

तेलंगणमधील टाळेबंदी पूर्णपणे मागे

करोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी जवळपास महिनाभर राज्यात टाळेबंदी लागू करण्यात आली होती.

शैक्षणिक संस्था १ जुलैपासून सुरू

करोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याने तेलंगण सरकारने राज्यात लागू केलेली टाळेबंदी रविवारपासून पूर्णपणे उठविण्याचा निर्णय घेतला असून शैक्षणिक संस्थाही १ जुलैपासून सुरू करण्याचे ठरविले आहे. करोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी जवळपास महिनाभर राज्यात टाळेबंदी लागू करण्यात आली होती.

राज्य मंत्रिमंडळाच्या शनिवारी झालेल्या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला आणि सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांना सर्व प्रकारचे निर्बंध हटविण्याच्या सूचना देण्यात आल्या, असे एका अधिकृत निवेदनामध्ये म्हटले आहे. राज्यातील करोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट झाली असून स्थिती नियंत्रणामध्ये असल्याचा अहवाल आरोग्य विभागाने दिला आहे. सर्व   शैक्षणिक संस्था १ जुलैपासून सुरू कराव्यात आणि विद्यार्थ्यांना वर्गात हजर राहण्याची अनुमती द्यावी, असा आदेश  देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांची हजेरी, ऑनलाइन वर्ग यासह मार्गदर्शक तत्त्वे तयार करून ती तातडीने प्रसृत करावी, असे मंत्रिमंडळाने  सांगितले आहे.

आसाममध्ये लसीकरण

गुवाहाटी : आसाममध्ये सोमवारपासून  १० दिवस दररोज तीन लाख लोकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट  ठेवले आहे, असे मुख्यमंत्री हिमंत सरमा यांनी शनिवारी  सांगितले.  एक आठवडा  संपूर्ण सरकारी यंत्रणा लसीकरणाचेच काम करणार  आहे.

करील, असेही मुख्यमंत्री म्हणाले. शासकीय कार्यालये १ जुलैपासून सुरू होतील आणि सर्व कर्मचाऱ्यांनी याच महिन्यात लसीकरण करून घ्यावे, असेही ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2021 12:01 am

Web Title: corona virus infection corona positive patient lockdown telangana akp 94
Next Stories
1 आपत्कालीन सरावामुळे मृत्यू झाल्याचा पुरावा नाही
2 डॉक्टरांवर हल्ले झाल्यास कठोर कारवाईचे केंद्राचे राज्यांना आदेश
3 इराणच्या अध्यक्षीय निवडणुकीत रइसी यांचा विजय
Just Now!
X